Main Featured

शिवाजी विद्यापीठाच्या अंतिम वर्ष परीक्षा "या" तारखेपासून

shivaji university
अंतिम वर्ष शेवटच्या सत्राच्या नियमित अभ्यासक्रमांच्या परीक्षा (exam)एक आठवडा उशिराने 17 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. याबाबतचा निर्णय गुरुवारी परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत झाला. 139 अभ्यासक्रमासाठी विद्यापीठ (shivaji university) कार्यक्षेत्रातून सुमारे 74 हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत.

शिवाजी विद्यापीठ परीक्षा विभागाकडून अंतिम वर्ष शेवटचे सत्र परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे. सर्व नियमित अभ्यासक्रमाच्या परीक्षांना 10 ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार होता. परंतु सप्टेंबर महिन्याच्या अखेर विद्यापीठ सेवकांनी प्रलंबित मागण्यांसाठी लेखणी बंद आंदोलन पुकारले होते. 

Must Read

1) मराठा संघटनांकडून उद्याचा महाराष्ट्र बंद मागे

2) आता येतंय Green Ration Card

3) टीव्ही टीआरपी रॅकेटचा पर्दाफाश; ‘रिपब्लिक’सह ३ चॅनल्सची चलाखी

4) क्रीडा विभागातून कुस्तीपटू बबीता फोगटचा राजीनामा

5) COVID-19 : मॉडर्ना कंपनीने कोरोना लशीसंदर्भात घेतला मोठा निर्णय

6) प्रकाश आंबेडकर यांचे वादास निमंत्रण…

यामुळे विद्यापीठ (shivaji university) प्रशासकीय व परीक्षा विभागाचे कामकाज ठप्प होते. उच्चशिक्षण मंत्री यांच्या आश्‍वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. परीक्षा सॉफ्टवेअर घेण्यास 5 ऑक्टोबरनंतर मान्यता मिळाली. परिणामी परीक्षांच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत

अंतिम वर्ष परीक्षेच्या पार्श्‍वभूमीवर नूतन कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी परीक्षा व मूल्यमापन मंडळाची बैठक झाली. त्यानुसार अंतिम वर्षाच्या कला, वाणिज्य, विज्ञान, शिक्षणशास्त्र, वायसीएसआरडीकडील अभ्यासक्रम, अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापन व इतर परीक्षा घेण्याचा निर्णय झाला. 

प्राध्यापकांकडून प्रश्‍नपत्रिका संच तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. प्रश्‍नपत्रिका संच तयार झाल्यानंतर प्राध्यापकांना यूजर आयडी व पासवर्ड देण्यात येणार आहे. त्यांना सॉफ्टवेअरमध्ये (software) प्रश्‍नपत्रिका संच अपलोड करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. 12 ऑक्टोबरनंतर विद्यार्थ्यांना सराव प्रश्‍नपत्रिका (मॉक टेस्ट) उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक जी. आर. पळसे यांनी दिली आहे.

74 हजार विद्यार्थी ऑनलाईन, ऑफलाईन परीक्षा देणार

विद्यापीठ कार्यक्षेत्रातून 74 हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन, ऑनलाईन परीक्षेसंदर्भातील (online exam) फॉर्म भरण्याची लिंक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर आहे. आतापर्यंत 50 हजार 417 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन तर 10 हजार 113 विद्यार्थ्यांनी ऑफलाईनचा पर्याय निवडला आहे. अद्याप 13 हजार 481 विद्यार्थ्यांनी कोणताच पर्याय निवडलेला नाही.