Main Featured

आण्णांची शेवंता म्हणते.. 'तुझं माझं जमतंय'!

Entertainment news -serial ratris khel chale
Entertainment news- अभिनेत्री अपुर्वा नेमळेकरने रात्रीस खेळ चाले २ मालिकेत (serial)शेवंताची भूमिका साकारत अख्या महाराष्ट्राला (Maharashtra)वेड लावले होते. शेवंताच्या अदांनी संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ घातली होती. आता पुन्हा एकदा शेवंता म्हणजेच अपुर्वां नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

रात्रीस खेळ मालिका संपल्यानंतर अपुर्वाने नव्या मालिकेत प्रवेश केला आहे. झी युवा वरील आगामी मालिका तुझ माझ जमतंय मध्ये अपुर्वा महत्त्वपुर्ण भूमिका बजावणार आहे. आपल्या अदाकरांनी घायळ करणारी शेवंता म्हणजे अभिनेत्री अपुर्वा पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर तितक्याच मादक व्यक्तिरेखेत पुनरागमन करणार आहे. 


Must Read

1) केंद्रीय मंत्री नितिन गडकरींचे खासदार डॉ. कोल्हे यांना पत्र, कारण...

2) ...तर फडणवीसांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेण्याचा मार्ग मोकळा

3) चीनला भारी किंमत चुकवावी लागेल; ट्रम्प यांचं मोठं विधान

4) राज्यात चालवणार ५ विशेष रेल्वे; मध्य रेल्वेचा निर्णय

5) MPSCच्या परीक्षांबाबत मुख्यमंत्री घेणार अंतिम निर्णय


या मालिकेत अपुर्वा पम्मी ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. पम्मी या भूमिकेतून अपूर्वा पुन्हा एकदा प्रेक्षकांना क्लीन बोल्ड करण्यासाठी सज्ज झालीय. या मालिकेची शैली विनोदी असून पम्मी ही या मालिकेला ग्लॅमरचा तडका देणार आहे. सध्या तिचे काही फोटो सोशल मीडियावर (social media)व्हायरल होत आहेत.