sharad pawarpolitics in india - लोकसभा निवडणुकीत आपल्याला हवी ती जागा न मिळाल्याने राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला होता. राष्ट्रवादीने नगर दक्षिणची जागा सोडण्यास नकार दिला होता. यानंतर सुजय विखे यांना भाजपाकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आणि त्यांनी विजय मिळत राष्ट्रवादीच्या (NCP) संग्राम जगताप यांचा पराभव केला. दरम्यान सुजय विखे यांनी आपल्याला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून तिकीट नाकारण्यासंबंधी गौप्यस्फोट केला आहे.

“हेलिकॉप्टर या एकमेव कारणामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने माझं लोकसभेला तिकीट कापलं,” असा दावा सुजय विखे यांनी नगरमध्ये सभेत बोलताना केला आहे. “शरद पवारांनी (sharad pawar) हेलिकॉप्टरसंबंधी प्रश्न विचारला आणि त्यानंतर आघाडीने तिकीट कापलं,” असं ते म्हणाले आहेत. “उमेदवारी देण्याअगोदर शरद पवार यांनी तू आताच जर हेलिकॉप्टरमधून फिरत असशील तर निवडून कसा येणार? असा प्रश्न मला विचारला होता. नंतर आघाडीने मला तिकीट नाकारलं आणि त्यानंतर जे काही झालं ते सगळं आपल्यासमोर आहे”, असं सुजय विखे म्हणाले. (politics in india)

Must Read

1) शिवसेना खासदार संजय जाधव यांना जीवे मारण्याची सुपारी

2) येस बँकेप्रमाणेच पंजाब, महाराष्ट्र सहकारी बँक ठेवीदारांना...

3) CSK च्या सुपर फॅनचे दिड लाख फिटले; धोनीनं खुद्द घेतली दखल (VIDEO)

4) खासदार उदयनराजे सरकारवर भडकले

5) राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची संभाव्य यादी


पुढे बोलताना त्यांनी हेलिकॉप्टरमुळे कोणाला फायदा झाला असेल माहिती नाही पण माझं नुकसान झालं असं म्हटलं. “पण त्यावेळी नुकसान वाटत असलं तरी आता त्याचे फायदे दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या  (pm narendra modi) नेतृत्त्वात काम करण्याचा आपल्याला अभिमान वाटतो,” असं त्यांनी सांगितलं.

अजित पवार यांनी विखेंवर टीका करताना सूर्य उगवतो विखे तिकडे जातात. त्यांना वाटलं सूर्य तिकडे उगवेल. मात्र. तो इकडेच उगवला असा टोला लगावला होता. यावर उत्तर देताना सुजय विखे यांनी सांगितलं होतं की, “भाजपामध्ये अनेकांनी प्रवेश केला. त्यामध्ये भाजपाची सत्ता येणार म्हणून काहींनी प्रवेश केला असा तर्क लावला जात आहे. पण आम्ही भाजपामध्ये गेलो कारण यांनी आम्हाला संधी दिली. हाच आमच्या आणि इतरांच्या प्रवेशातील मुख्य फरक आहे”.

सुजय विखे यांनी म्हटलं होतं की, “केंद्रात भाजपाची सत्ता येईल, नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील याची आम्हाला कल्पना नव्हती. आम्ही प्रामाणिकपणे काँग्रेसचं काम केलं होतं. जर आम्ही उगवत्या सुर्याकडे जाऊ नये