share market
अगदी कालपर्यंत शेअर बाजार
(share market)तेजीत धावत होता. बुधवारी सलग दहाव्यादिवशी शेअर मार्केटच्या सेन्सेक्स, निफ्टीने वाढ नोंदवली. २००७ नंतर तेरा वर्षांनी प्रथमच अशा प्रकारची तेजी दिसली होती. पण गुरुवारी मात्र सेन्सेक्सच्या (sensex)घोडदौडीला ब्रेक लागला आणि सेन्सेक्स एक हजार अंकांनी कोसळला.

Must Read

कोरोनाग्रस्त क्रिस्टियानो रोनाल्डोने तोडला 'नियम'


मागच्या दहा दिवसात जे कमावले होते, ते सगळे निघून गेले. एकादिवसात गुंतवणूकदारांचे २.७ लाख कोटींचे नुकसान झाले. सेन्सेक्स कोसळण्याला काही कारणे आहेत. बँकिंग, वित्तीय आणि आयटीच्या समभागांमध्ये घसरण झाली. सेन्सेक्स १०६६ अंकांनी तर एनएसई निफ्टी २९१ अंकांनी घसरला. दिवसअखेर सेन्सेक्स (sensex) ३९,७२८ आणि निफ्टी ११, ६८० अंकांवर बंद झाला.

बजाज फायनान्स, टेक महिंद्रा, आयसीआयसीआय बँक (ICICI Bank), एसबीआय (SBI Bank) आणि रिलायन्सच्या शेअर्समध्ये घसरण झाली. फक्त एशियन पेंटसचे शेअर्सचे भाव वाढले.

अमेरिका जागतिक अर्थव्यवस्थेचे मुख्य चाक आहे. अमेरिकेकडून पॅकेज जाहीर होईल, अशी अपेक्षा होती. पण अंतर्गत राजकारणामुळे अमेरिकेने (america)घोषणा लांबणीवर टाकली. चीन सुद्धा जागतिक अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. चीन-अमेरिका तणावाचा बाजारावर परिणाम झाला. युरोपमध्ये पुन्हा एकदा करोना व्हायरसची लाट आली आहे. त्यामुळे युरोपियन देशांनी पुन्हा लॉकडाउन, निर्बंधांचा मार्ग अवलंबला आहे. या सर्वांचा परिणाम तेजीत धावत असलेल्या शेअर बाजारावर झाला आणि सेन्सेक्स कोसळला.