MaharashtraMaharashtra
- राज्यातील शासकीय, खासगी, अनुदानित व विनाअनुदानित शाळा सुरू करण्याचे संकेत राज्य सरकारने दिले आहेत. सुमारे ५० टक्के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ऑनलाईन शिक्षणाशी (online education) संबंधित कामासाठी तात्काळ कामावर रुजू होण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. 

त्याबरोबरच शाळा २ ते ३ वेळेस निर्जंतुकीकरण, पालकांच्या लेखी संमतीनेच मुलांना शाळेत प्रवेश तसेच अध्यापन साहित्य व संगणकांचे निर्जंतुकीकरण करण्याचे आदेश देत राज्य सरकारने राज्यातील सर्व शाळा सुरू करण्याचे संकेत दिले आहेत.

Must Read

1) सांगलीत आज आपत्ती व्यवस्थापन कक्षासह तीन कामांचे लोकार्पण

2) विराट कोहलीने सांगितलं आरसीबीच्या हरण्यामागचं कारण

3) लवकरच पुरुषांसाठीही गर्भनिरोधक औषध

4) सरकारने लागू केली आरोग्य विम्याची नवी योजना

2) IPL 2020 : बुमराहचा स्पेशल रेकॉर्ड


राज्यात कोविडच्या प्रादुर्भावामुळे शाळा प्रत्यक्षात सुरू करणे शक्य नाही. यामुळे स्थानिक परिस्थितीनुसार शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात यावेत. हे अधिकार संबंधित जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्त व शाळा व्यवस्थापन समिती यांना प्रदान करण्यात आले आहेत. काही ठिकाणी प्रत्यक्षात शाळा सुरू करता आल्या नाहीत. विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये यासाठी पूर्वप्राथमिक ते इयत्ता बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण  (online education)  सुरु करण्यात आले आहे.

आता प्रवासाची सार्वजनिक वाहने सुरू झाल्यामुळे राज्य शासनाने सर्व शाळांमधील ५० टक्के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ऑनलाईन कामासाठी तत्काळ रुजू होण्याचे आदेश गुरुवारी (दि.२९) दिले आहेत. जे शिक्षक गाव व शहरापासून प्रवास करून येतात, त्यांनी शक्यतो सार्वजनिक वाहतूक व्यवस्था न वापरता वैयक्तिक वाहन वापरून शाळेत येण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

जे शिक्षक लोकल ट्रेन, बस व सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करतात त्यांनी मास्क व शारीरिक अंतराबाबतचे नियम पाळावेत. तसेच तोंडाला हात लावू नये,  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची शाळेच्या प्रवेशद्वारावर तपासणी, कर्मचाऱ्यांना मास्ती सक्ती करण्याचे आदेश दिले आहेत.

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शाळेच्या परिसरात वावरताना किमान सहा फूट शारीरिक अंतर ठेवून वापरण्यास मुभा देण्यात आले आहे. शाळेमध्ये हात स्वच्छ धुण्यासाठी साबण व स्वच्छ पाण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश शाळा प्रशासनाला दिले आहेत. शाळेतील स्वच्छतागृहांचे निर्जंतुकीकरण वारंवार करण्यात यावे तसेच शाळेच्या परिसराचे दिवसातून किमान एक वेळ स्वच्छता व निर्जंतुकीकरण करावे. 

कुटुंबातील कोणी कोविड अबाधित असल्यास त्यांनी शाळेत येऊ नये, चिंता आणि निराशा सारख्या मानसिक आरोग्याच्या समस्या असणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी समुपदेशन करण्याची व्यवस्था करावी इत्यादी सूचना आज शालेय शिक्षण विभागाने करत शाळा सुरु करण्याचे संकेत दिले आहेत.