Main Featured

राज्यातील शाळा दिवाळीनंतर सुरू होणार?

school reopening
देशात येत्या १५ ऑक्टोबरपासून शाळा सुरू होण्यास केंद्रीय गृहमंत्रालयाने हिरवा कंदिल दाखवला असला तरी महाराष्ट्रात मात्र ऑक्टोबर महिन्यात शाळा सुरू होणार नाहीत. शाळा कधी सुरू करायच्या याबाबतचा बुधवारी महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाल्याचे वृत्त  आहे. त्यानुसार, १५ ऑक्टोबरऐवजी पुढील महिन्यात दिवाळीनंतर शाळा सुरू (school reopening)करण्याचा निर्णय घेण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला.

Must Read

1) केंद्रीय मंत्री नितिन गडकरींचे खासदार डॉ. कोल्हे यांना पत्र, कारण...

2) ...तर फडणवीसांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेण्याचा मार्ग मोकळा

3) चीनला भारी किंमत चुकवावी लागेल; ट्रम्प यांचं मोठं विधान

4) राज्यात चालवणार ५ विशेष रेल्वे; मध्य रेल्वेचा निर्णय

5) MPSCच्या परीक्षांबाबत मुख्यमंत्री घेणार अंतिम निर्णय


केंद्र सरकारने सोमवारी ५ ऑक्टोबर रोजी अनलॉक ५ अंतर्गत मार्गदर्शक तत्वे जारी केली. यानुसार, देशातील शाळा १५ ऑक्टोबरपासून आवश्यक त्या आरोग्यविषयक खबरदारीसह सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली (school reopeningआहे. मात्र अंतिम निर्णय राज्यांवर सोपवण्यात आला आहे.

राज्यात कोविड-१९ विषाणू महामारीची स्थिती अद्याप सुधारलेली नाही. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये शाळा-महाविद्यालये सुरू करता येणार नाहीत, हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. मात्र दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय घ्यायचा का यावर कॅबिनेटमध्ये चर्चा झाली. दिवाळी नोव्हेंबर महिन्याच्या मध्यावर आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी शालेय शिक्षण विभागाला ऑनलाइन शिक्षण कसं सुरू आहे, त्याचा आढावा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. मार्च महिन्यापासून शाळा-महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस बंद आहेत. चालू शैक्षणिक वर्षातील शिक्षण ऑनलाइन पद्धतीनेच सुरू आहे.

महाराष्ट्रात (Maharashtra) कोविड-१९ स्थिती अद्यापही सामान्य झालेली नाही. करोना संसर्ग स्थिती योग्य नसल्याने शाळा-महाविद्यालये सुरू करता येणार नाही, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अलीकडेच म्हटले आहे.