state bank of indiaकळंब शहरात कोरोनाचा (coronavirus)कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. भारतीय स्टेट बॅंकेतील (sbi)10 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने मागच्या तीन दिवसांपासून बॅंक बंद ठेवण्यात आली आहे. यामुळे लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल ठप्प झाल्याने ग्राहकांच्या अडचणी वाढल्या आहेत. ऐन सणासुदीच्या काळात तीन दिवसांपासून बॅंक बंद ठेवून ग्राहकांना वेठीस धरणे योग्य नसल्याचे मत ग्राहक, व्यापारी व्यक्त करीत आहेत.

Must Read

1) उद्योग क्षेत्रातील कामगारांना वेतनवाढ मिळण्याची शक्यता

2) आमिर खानच्या मुलीने दिली इन्स्टाग्रामवर धमकी...

3) अ‍ॅमेझॉन अन् फ्लिपकार्टला मनसेचा इशारा

4) लग्नाचं आमिष दाखवून रेपचा आरोप; मिथुन चक्रवर्ती यांच्या मुलासह पत्नीवर गुन्हा

5) मंत्रालय, स्वारगेट, कोल्हापूर, अलिबागसाठी ५० शिवशाही

6) 'वर्क फ्रॉम होम'मुळे सायबर गुन्ह्यात मोठी वाढ


कळंब शहरात कोरोनाबाधितांची संख्या काही केल्या कमी व्हायचे नाव घेत नाही. त्यातच शहरातील भारतीय स्टेट बॅंकेचे दहा कर्मचारीच पॉझिटिव्ह आल्याने बँकेचे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. हैद्राबाद बँकेचे भारतीय स्टेट बँकेत (sbi) विलगीकरण करण्यात आले असल्याने 20 ते 22 हजार ग्राहकांची संख्या आहे. सध्या सणासुदीचे दिवस आहेत. कोरोनामुळे सततच्या टाळेबंदीमुळे व्यापारी आधीच आर्थिक अडचणीत आलेले आहेत. कठीण परिस्थितीत व्यवसाय सुरू असताना मागच्या तीन दिवसांपासून बॅंकेचे व्यवहार ठप्प झाल्याने ग्राहक व व्यापाऱयांनसमोर नवीनच प्रश्न उभे ठाकले आहेत.

बॅंकेचे व्यवहार बंद असल्याने पैसे ट्रान्स्फर करणे, पैसे जमा करणे, काढणे तसेच इतर बॅंकेला पैसे पुरविणे, शेतकरी व मजूर वर्गाचे छोटे- मोठे व्यवहार ठप्प झाले आहेत. बॅंक बंद असल्याचा परिणाम येथील बाजारपेठेवर झाला असून व्यवहार होत नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे.

रिझर्व बॅंकेने (RBI) दखल घ्यावी

कर्मचारी कोरोनामुळे पॉझिटिव्ह (corona postive)आले आहेत. त्यामुळे आर्थिक व्यवस्था ढासळली आहे. तीन दिवसांपासून बॅंक बंद ठेवण्यात आल्याने सर्व प्रकारचे व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने या गंभीर प्रकारची दखल घ्यावी अशी मागणी येथील व्यापारी संघटनेने केली आहे.