Salman Khan

अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) च्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये नेपोटिझम (Nepotism)वरुन बरंच भाष्य करण्यात आलं. बॉलिवूडचे अनेक स्टार्स अडचणीत आले. नेपोटिझमचा वाद बिग बॉस (Big Boss 14)च्या घरापर्यंतही पोहोचला आहे. नेपोटिझमच्या वादामुळे सलमान खान (Salman Khan) नाराज झाला आहे.नेपोटिझमवर वाद सुरू झाला तेव्हा सलमान खानने त्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. पण आता बिग बॉसच्या घरातच नेपोटिझमवरुन वाद होऊ लागल्यामुळे सलमान खान चांगलाच भडकला होता. गायक राहुल वैद्य (Rahul Vaidya)ने जान कुमार सानू (Jaan Kumar Sanu)वर नेपोटिझमचा आरोप केला होता. त्यामुळे 'वीकेंड का वार' (Weekend Ka Vaar)  सलमान त्याच्यावर चांगलाच भडकला.Must Read

1) अनिल अंबानी यांचे मुख्यालय जाणार येस बँकेच्या ताब्यात

2) अल्पवयीन मुलीवर पुण्यात सामूहिक बलात्कार

3) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जमीन घोटाळा केल्याचा गंभीर आरोप

4) PHOTOS: 'मिर्झापूर 2' मधील डिप्पी खऱ्या आयुष्यात आहे भलतील ग्लॅमरस, See Pics

5) टवटवीत आणि चमकदार त्वचेसाठी नियमित करा फक्त 6 योगासनं

बिग बॉस 14 च्या ‘वीकेंड का वार’ प्रोमो रीलिज झाला आहे. यामध्ये सलमान खान  (Salman Khan)  राहुल वैद्यला म्हणतो, "नेपोटिझमवर बोलण्यासाठी बिग बॉसचा मंच योग्य नाही." या आठवड्याच्या सुरुवातीला राहुल वैद्यने सुप्रसिद्ध गायक कुमार सानू यांच्या मुलावर नेपोटिझमचा आरोप केला होता. जान सानूला त्याच्या वडिलांमुळे बिग बॉसमध्ये काम मिळालं आहे. असं राहुल म्हणाला होता.

सलमान पुढे म्हणाला, "जर माझ्या वडिलांनी माझ्यासाठी काही प्रयत्न केले तर ते नेपॉटिझम झालं का?" सलमानच्या प्रश्नांवर राहुल वैद्य शांत होता. हा भाग प्रदर्शित झाल्यानंतर बिग बॉस 14 वरुन पुन्हा वाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.