Bollywood- बॉलिवूडचा ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’ सलमान खान (salman khan)लग्न कधी करणार हा जणू राष्ट्रीय प्रश्नच झाला आहे. अनेक कार्यक्रमात त्याला त्याच्या लग्नाविषयी विचारलं जातं. अनेक अभिनेत्रींशी त्याचं नावंही जोडलं जातं. त्यामुळे सलमान कायम या प्रश्नांची उत्तर देण्याचं टाळत असल्याचं दिसून येतं. मात्र, बिग बॉस१४ च्या सेटवर त्याने लग्नाविषयी खुलासा केला आहे. विशेष म्हणजे माझं लग्न झालं आहे असं तो म्हणाला आहे. त्यामुळे अनेकांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या आहेत.

Must Read

1) कोल्हापुरी! ऑनलाईन दुकानात आता घरबसल्या मिळणार अस्सल कोल्हापुरी चप्पल

2) महाविकासआघाडी सरकार हे बिघाडी सरकार आहे : हर्षवर्धन पाटील

3) प्रेग्नन्सीची न्यूज दिल्यानंतर अनिता हसनंदानी शेअर केले असे PHOTO

4) शुल्लक कारणावरुन रिक्षाचालकाला मारहाण; VIDEO

5) डोक्यात लोखंडी रॉडने वार करत पत्नीला संपवलं

अलिकडेच बिग बॉसच्या सेटवर अभिनेता सिद्धार्थ शुक्ला लवकरच लग्न करणार आहे अशी घोषणा सलमान खानने केली. मात्र, सिद्धार्थच्या लग्नाची चर्चा होण्याऐवजी घरातली स्पर्धकांनी सलमानलाच त्याच्या लग्नाविषयी प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. यात अभिनेत्री हिना खानने सलमान खान लग्न कधी करणार असा प्रश्न विचारला. त्यावर भाईजानने (salman khan) उत्तर दिलं.

“माझं लग्न झालं आहे. खरं तर माझं लग्न करण्याचं वय झालं आहे. पण आता लग्न करण्याचं वय उलटून गेलं आहे. अरे, मला नाही करायचं लग्न. कोणाला काही प्रॉब्लेम आहे का कोणाच्याही लग्नाचा मुद्दा निघाला की थेट माझ्या लग्नाविषयी प्रश्न विचारण्यास सुरुवात करतात”, असं सलमान म्हणाला. भाईजानने उत्तर दिलं.


दरम्यान, सिद्धार्थ शुक्ला ‘बालिका वधू’ या मालिकेत लग्न करणार आहे असा खुलासा सलमानने केला आणि मंचावर एकच हशा पिकला. परंतु, अनेकदा सलमानला त्याच्या लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात आले आहेत. यापूर्वीदेखील त्याने अनेकदा लग्न करण्यास नकार दिला आहे, मात्र, वारंवार त्याला लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात येत असल्याचं पाहायला मिळतं.