Main Featured

देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला रोहित पवारांचे उत्तर

devendra fadnavis and rohit pawar
politics- माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis)यांनी कोकणाला शिवसेनेने भरभरून दिले, पण या सरकारने कोकणाला काय दिले? केवळ १६ कोटी रूपये विदर्भाला दिले. राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला. 

Must Read

1) मराठा संघटनांकडून उद्याचा महाराष्ट्र बंद मागे

2) आता येतंय Green Ration Card

3) टीव्ही टीआरपी रॅकेटचा पर्दाफाश; ‘रिपब्लिक’सह ३ चॅनल्सची चलाखी

4) क्रीडा विभागातून कुस्तीपटू बबीता फोगटचा राजीनामा

5) COVID-19 : मॉडर्ना कंपनीने कोरोना लशीसंदर्भात घेतला मोठा निर्णय

सोयाबीन, कपाशी संपूर्ण नष्ट झाले असून सरकार दिसत आहे तरी कुठे? असा सवाल केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या या वक्तव्यावरून राजा उदार झाला अन् हाती भोपळा दिला, असे म्हणताना चुकून पंतप्रधानांऐवजी मुख्यमंत्री म्हणालात, असे म्हणत फडणवीसांना टोला लगावला.राजा उदार झाला अन हाती भोपळा दिला’ असं म्हणताना @Dev_Fadnavis साहेब आपण चुकून PM ऐवजी CM म्हणालात… कारण ही म्हण केंद्र सरकारला तंतोतंत लागू होतेय… पण आता येत्या #GST कौन्सिलच्या बैठकीनंतर तरी हाती भोपळा न देता राज्याला हक्काचा निधी द्यावा, ही अपेक्षा, असे म्हणत रोहित पवार यांनी फडणवीसांना टोला (politics)लगावला. फडणवीसांवर त्यांनी ट्विटरवरून निशाणा साधला.

कोकणाला शिवसेनेने भरभरून दिले, पण कोकणाला या सरकारने काय दिले? केवळ १६ कोटी रूपये विदर्भाला दिले. राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला. सोयाबीन, कपाशी संपूर्ण नष्ट झाले असून सरकार दिसत आहे तरी कुठे? असा सवाल फडणवीस यांनी केला होता. सोयाबीन, कपाशी संपूर्ण नष्ट झाले आहे पण सरकार आहे तरी कुठे? मागील वर्षी पिकले ते खरेदी केले नाही. सत्तेत आम्ही असताना प्रोफेशनल शेतकरी नेते रस्त्यावर उतरत होते. ते आता कुठे गायब झाले आहेत? लबाडी काय असते हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँगेसकडून शिकावे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.