Main Featured

SSR Death Case- अखेर रिया चक्रवर्तीची तुरुंगातून सुटका

Rhea Chakraborty
सुशांत सिंग राजपूत (sushant singh rajput) प्रकरणात ड्रग्स कनेक्शनमध्ये (drugs case) अटक झालेल्या रिया चक्रवर्तीला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. ड्रग्स खरेदी केल्याच्या आरोपाखाली रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती आणि इतर 18 आरोपींची आज न्यायालयीन कोठडी संपणार होती. मात्र, याप्रकरणी मंगळवारी सुनावणी करताना मुंबई कोर्टाने रिया आणि शौविक चक्रवर्तीच्या न्यायालयीन कोठडीत 20 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली होती. त्यानंतर, आज न्यायालयाने रियाला सशर्त जामीन मंजूर केला असून शौविकचा जामीन अर्ज फेटाळला आहे. 

Must Read

1) आमदारानं 19 वर्षांच्या मुलीशी केलं लग्न

2) मराठमोळी नेहा पेंडसे एथनिक ड्रेसमध्ये दिसते झक्कास..! Photos

3) राजस्थान रॉयल्सच्या कर्णधाराला 12 लाखांचा दंड

4) शिक्षक भरती घोटाळ्यात भाजपा नेत्याला अटक

5) Video: १०३ वर्षीय आजोबांनी १४ हजार फुटांवरुन मारली उडली


मागील सुनावणीमध्ये विशेष न्यायालयाने रिया चक्रवर्तीची न्यायालयीन कोठडी 6 ऑक्टोबरपर्यंत वाढवली होती. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती आणि इतर 18 आरोपींच्या जामीन अर्जाला विरोध करत त्यांचा जामीन अर्ज फेटाळायला सांगितला होता. मात्र, मुंबई उच्च न्यायलयाने रिया चक्रवर्तीसह, सॅम्युल मिरांडा आणि दिपेश सावंत यांना जामीन मंजूर केला आहे. रियाला 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन देण्यात आला असून पुढील 10 दिवस 11 ते 5 या वेळेत रियाला जवळील पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, शौविक चक्रवर्ती आणि परिवार यांना जामीन देण्यास न्यायलयाने नकार दिला आहे. 

रियाला होऊ शकते 10 वर्षांची शिक्षा


एनसीबीने म्हटले की समाजाला विशेष करून तरूणांना संदेश देण्याची गरज आहे की अमली पदार्थाचे सेवन करण्यापासून दूर रहा. जर त्यांनी असे केले तर त्यांनादेखील अशाच प्रक्रियेला सामोरे जावे लागेल. 8 सप्टेंबरला एनसीबीने बरीच चौकशी केल्यानंतर रिया चक्रवर्तीला अटक केली होती. जर या प्रकरणात रिया चक्रवर्ती दोषी आढळली तर तिला 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते. सुशांत सिंग राजपूत प्रकरणात एनसीबीने ड्रग्स अँगलचा (drugs case) तपास करत आहे. एनसीबीला या तपासात पुरावे हाती लागले आहेत. आतापर्यंत एनसीबीने 17 जणांना अटक केली आहे