Main Featured

रिया चक्रवर्तीसाठी रितेश देशमुख सपोर्टमध्ये

ritesh and rhea
सुशांत सिंग राजपूत (sushant singh rajput)प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर एनसीबीने अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक केली होती. यानंतर महिनाभर तुरुंगात राहिल्यानंतर नुकतीच रियाची जामिनावर सुटका झाली. रियाला जामीन मिळताच बॉलिवूडचे (bollywood)अनेक सेलिब्रिटी तिच्या सपोर्टमध्ये सोशल मीडियावर (social media) व्यक्त झाले होते. यात आता आणखी एका अभिनेत्याचे नाव समाविष्ट झाले आहे.तो म्हणजे रितेश देशमुख.


Must Read

1) कोल्हापुरी! ऑनलाईन दुकानात आता घरबसल्या मिळणार अस्सल कोल्हापुरी चप्पल

2) महाविकासआघाडी सरकार हे बिघाडी सरकार आहे : हर्षवर्धन पाटील

3) प्रेग्नन्सीची न्यूज दिल्यानंतर अनिता हसनंदानी शेअर केले असे PHOTO

4) शुल्लक कारणावरुन रिक्षाचालकाला मारहाण; VIDEO

5) डोक्यात लोखंडी रॉडने वार करत पत्नीला संपवलं


रिया चक्रवर्तीने कालच पोलिसांत तिची शेजारीण डिंपल थवानीविरोधात तक्रार दाखल केली. सुशांतच्या  (sushant singh rajput)मृत्यूच्या एक दिवसआधी म्हणजे, 13 तारखेला तो व रिया सोबत होते, आपण त्यांना एकत्र पाहिले होते, असा दावा डिंपलने केला होता. मात्र सीबीआयसमोर डिंपल या दाव्यावरून पलटली आणि रियाने खोटा दावा करणा-या डिंपलविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. डिंपलने आपल्यावर खोटे आरोप करत, प्रकरणाला चुकीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला, असे रियाने तिच्या तक्रारीत म्हटले आहे.

रिया चक्रवर्तीने (rhea chakraborty) शेजारी महिलेविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर रितेशने ही प्रतिक्रिया (social media) दिली आहे. 'तुला लढण्याचे बळ मिळो रिया.सत्यापेक्षा सामर्थ्यवान काहीच नाही,' असे ट्वीट रितेशने केले आहे.

सीबीआयसमोर (CBI) रिया चक्रवर्तीच्या शेजारी महिलेचा युटर्न

रिया चक्रवर्तीची (rhea chakraborty) शेजारीण डिंपल थवानीने सुशांतने आत्महत्या करण्यापूर्वी एक दिवस, म्हणजे 13 जूनला रियाला आणि सुशांतला एकत्र पाहिल्याचा दावा केला होता. तिच्या या दाव्याने खळबळ माजली होती. यानंतर सीबीआय टीमने डिंपल थलावीची चौकशी केली. 

सुशांतच्या आत्महत्येपूर्वी एक दिवस सुशांत आणि रियाला एकत्र पाहिले का? असा सवाल सीबीआयने डिंपलला विचारला तेव्हा मात्र तिने आपला जबाब पलटवला. रिया आणि सुशांत आत्महत्येपूर्वी भेटले होते, असे मी कोणाकडून तरी ऐकले होते. मी स्वत: त्यांना एकत्र पाहिले नाही, असा जबाब तिने दिला. तिच्या या बदललेल्या जबाबामुळे तपासाला एक वेगळाच ट्विस्ट मिळाला आहे.