Main Featured

रेस्टॉरंट, बारच्या वेळांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय


restaurants-and-bar-open-till-10-pm-maharashtra

  राज्य सरकारने मिशन बिगेन अगेन अंतर्गत राज्यातील रेस्टारेंट आणि बार सुरू करण्याचा निर्णय घेतला मात्र, रेस्टारेंट बारच्या वेळेसंदर्भात रेस्टारेंट आणि बार मालकांमध्ये संभ्रम होता. मात्र, बुधवार पर्यटन विभागा (Department of Tourismने काढलेल्या सुधारित नवीन आदेशावरून रेस्टारेंट, बार मालकांना वेळ वाढवून देण्यात आली आहे. त्यामुळे बार मालकांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र रेस्टारेंट,बार चालकांनी ही वेळ पुरेसी नसल्याचे सांगून, पुढच्या आठवड्यात पालिका आयुक्तांना भेटून वेळ अधिक वाढवून देण्याची मागणी करणार असल्याचे सांगीतले.

Advertise

Must Read

1) केंद्रीय मंत्री नितिन गडकरींचे खासदार डॉ. कोल्हे यांना पत्र, कारण...

2) ...तर फडणवीसांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेण्याचा मार्ग मोकळा

3) चीनला भारी किंमत चुकवावी लागेल; ट्रम्प यांचं मोठं विधान

4) राज्यात चालवणार ५ विशेष रेल्वे; मध्य रेल्वेचा निर्णय

5) MPSCच्या परीक्षांबाबत मुख्यमंत्री घेणार अंतिम निर्णय

नवीन आदेशानुसार आता रेस्टारेंट आणि बार सकाळी 8 वाजता सुरू होऊन रात्री 10 वाजता बंद करता येणार आहे. राज्य सरकारने यापूर्वी 5 ऑक्टोबर रोजी मिशन 50 टक्के क्षमतेने रेस्टारेंट, बार सुरु करण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी कोविड नियमावलीही जारी करण्यात आली होती. मात्र वेळेचे बंधन घातल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्याशिवाय रेस्टारेंट बार किती वाजेपर्यंत सुरू ठेवावे यासंदर्भात संभ्रम असल्याने अनेक मद्य विक्रेत्यांनी आपले बार उघडलेच नव्हते.