इचलकरंजी येथील रसना कॉर्नर परिसरातील जुगार अड्ड्यासह एका मटका अड्ड्यावर गावभाग पोलिसांनी छापा टाकून 12 जणांना अटक केली. या कारवाईत चार दुचाकी, सात मोबाईल आणि 22 हजार 500 रुपयांची रोकड असा 1 लाख 73 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Must Read

1) महाविकास आघाडीच्या एकीला सुरुंग?

2) महाराष्ट्र राज्याच्या 'या' विभागात भरती

3) अभिनयानंतर 'या' श्रेत्रात पदार्पण करतेय मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर

4) मुंबई आणि पुण्यासाठी Good News

5) ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, रसना कॉर्नर परिसरात तीनपानी जुगार सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर गावभाग पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी बाबासो परिसा हुल्ले (रा. रसना कॉर्नर), अमोल शामराव होगाडे (रा. सरस्वती मार्केट), बाळू शंकर आरगे (रा. विक्रम नगर), सदाशिव शिवगोंडा तोडकर (रा. पाटील मळा), अमोल दत्तात्रय दानवाडे (रा. टिळक रोड), बाळासो मोहनराव नाईक (रा. नदिवेस नाका), रमेश गणपती उकले (रा. टिळक रोड), प्रशांत बाबुराव होमकर (रा. गुजरी पेठ), सचिन अशोक खाडे (रा. गुजरी कॉर्नर), अनंत बाळासाहेब कुडचे (रा. कुडचे मळा), संतोष वसंत चव्हाण (रा. नाट्यगृहामागे) यांचा समावेश आहे. तर मटका घेत असताना विनोद शांतीलाल शहा (रा. सम्राट अशोक नगर) यांना अटक केली.