Main Featured

अखेर भारतीयांनी कोरोनाविरोधातील उपचार शोधलाच!

coronavirus
कोरोनाव्हायरसवर (coronavirus) विविध औषधांनी उपचार केले जात आहे. लशींचं क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. प्लाझ्मा (plasma)थेरेपीचाही वापर करण्यात आला, मात्र प्लाझ्मा थेरेपी फारशी प्रभावी नसल्याचं इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने  (ICMR) स्पष्ट केलं आहे. मात्र आता भारतीय शास्त्रज्ञांनी कोरोनाव्हायरसविरोधातील प्रभावी असा उपचार शोधूनच काढला. या उपचाराच्या क्लिनिकल ट्रायललाही मंजुरी मिळाली आहे.

आयसीएमआर आणि हैदराबादमधील बायोलॉजिकल ई. लिमिटेड फार्मास्युटिकल (Biological E. Limited, Hyderabad) कंपनीने मिळून एक अँटिसेरा (Antisera) विकसित केलं आहे. ज्याच्या मानवी चाचणीला मंजुरी मिळाली आहे.

Must Read

1) आमदारानं 19 वर्षांच्या मुलीशी केलं लग्न

2) मराठमोळी नेहा पेंडसे एथनिक ड्रेसमध्ये दिसते झक्कास..! Photos

3) राजस्थान रॉयल्सच्या कर्णधाराला 12 लाखांचा दंड

4) शिक्षक भरती घोटाळ्यात भाजपा नेत्याला अटक

5) Video: १०३ वर्षीय आजोबांनी १४ हजार फुटांवरुन मारली उडली


अँटिसेरा हे एक ब्लड सीरम आहे. ज्यामध्ये एखाद्या विशेष आजाराविरोधात लढण्याची क्षमता असणाऱ्या अँटिबॉडीजचं (antibody) प्रमाण अधिक असतं. कोणत्याही विशेष संक्रमणाशी लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती लगेच वाढवण्यासाठी माणसांना हे सीरम इंजेक्शनच्या माध्यमातून दिलं जातं. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे  भारतीय शास्त्रज्ञांनी बॅक्टेरिया आणि व्हायरसशी लढण्यासाठी आवश्यक असलेल्या अँटिबॉडी तयार केल्या आहेत.

याआधीदेखील रेबीज, हेपेटायटिस, वॅक्सिनिया व्हायरस, टिटॅनस, डिप्थिरिया यासारख्या अनेक व्हायरल आणि बॅक्टेरिअल इन्फेक्शनवर अशा पद्धतीने उपचार करण्यात आले आहेत, असं आयसीएमआरने सांगितलं. आता कोरोनाव्हासरवर  (coronavirus)  उपचारासाठी घोड्यांना निष्क्रिय Sars-Cov-2 चं इंजेक्शन देऊन हे अँटिसेरा विकसित करण्यात आलं आहे.

आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. आयसीएमआर आणि हैदराबादमधील बायोलॉजिकल ई. लिमिटेड फार्मास्युटिकल कंपनीने मिळून हे अँटिसेरा विकसित केलं आहे. आम्ही घोड्याचं सेरा तयार केलं आहे. घोड्यांवर सेराचा अभ्यासही पूर्ण केला आहे.  आम्हाला आता याच्या क्लिनिक ट्रायलसाठी परवानगी मिळाली आहे.