ranveer singh




Bollywood- बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (ranveer singh) आपल्या बिनधास्त अंदाजासाठी नेहमीच चर्चेत राहतो. त्याच्या आगामी '८३' सिनेमाचीही प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. अशात त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एका दुचाकीस्वाराने गुरूवारी रणवीर सिंहच्या कारला धडक दिली. यात तसं कारचं काही नुकसान झालं नाही किंवा कुणी जखमीही झालं नाही. 

नक्की वाचा 

1) हिमालयात फुलला दुर्मिळ ब्रह्मकमळांचा मळा

2) एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यावरून शिवसेनेमध्ये नाराजी       का?

3) देशाला पहिला ऑस्करचा मान पटकावून देणाऱ्या मराठमोळ्या भानू अथैय्या यांचं निधन

 4)  कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

5) नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांची आॅनलाइन पायाभूत चाचणी



रणवीर सिंह (ranveer singhकारने डबिंग करून घरी परतत हता. यादरम्यान मागून आलेल्या एका दुचाकीस्वाराने त्याच्या मर्सिडीज कारला धडक दिली. या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, रणवीर सिंह गाडीतून खाली उतरून कारचं डॅमेज चेक करतो आणि परत गाडीत जाऊन बसतो.

दरम्यान रणवीर सिंहने काही दिवसांपूर्वी कोरोनाला (corona) रोखण्यासंबंधी मोहिमेचं एक ट्विट शेअर (tweet) केलं होतं. त्याने पंतप्रधान मोदी यांचं एक ट्विट रिट्विट करत लिहिले होते की, आपणे सगळे एकत्र येऊन कोरोना विरोधातील लढाई लढू.(Bollywood)

कामाबाबत सांगायचं तर रणवीर सिंह दिग्दर्शक कबीर खानच्या '८३' सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात दीपिका पादुकोणही त्याच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाची कथा १९८३ मध्ये जिंकलेल्या क्रिकेट वर्ल्डकपवर आधारित आहे. आधी हा सिनेमा (film)एप्रिल महिन्यात रिलीज होणार होता. पण कोरोनामुळे तसं होऊ शकलं नाही. आता हा सिनेमा ख्रिसमसला रिलीज होणार आहे.