Main Featured

राणी मुखर्जीला एक चूक पडली महागात
बॉलिवूड (bollywood)अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री राणी मुखर्जी (rani Mukerji)यांनी बऱ्याच चित्रपटात काम केले आहे. बऱ्याचदा शूटिंगदरम्यान कलाकारांमध्ये जवळीकता वाढते. या दोघांमध्येदेखील असेच काहीसे झाले होते. असे म्हटले जाते की जया बच्चन यांनी त्यांच्या नात्याला स्वीकारले देखील होते. पण नंतर त्यांच्या आणि राणीच्या नात्यात कटूता आली की ज्याचा परिणाम अभिषेकच्या रिलेशनशीपवर झाला.

Must Read

तेजस्विनी पंडित फोटोशूट शेअर करत म्हणाली- "वाट पहाते मी गं...

जया बच्चन यांचे व्यक्तीमत्त्व स्पष्टोक्ती आणि बेधडक असल्याचे म्हटले जाते. अभिषेक आणि राणी यांचे रिलेशनशीप खराब होण्यामागे जया बच्चन कारणीभूत होत्या असे सांगितले जाते.

राणी मुखर्जी  (rani Mukerji) आणि अभिषेक बच्चन (abhishek bachchan)लागा चुनरी में दाग या चित्रपटात एकत्र काम करत होते. सुरूवातीला सर्व काही ठीक होते. पण नंतर त्या दोघांच्या नात्यात वाद होऊ लागले आणि हे इतके वाढले की त्या दोघांनी एकमेकांशी बोलणेच बंद केले.  राणी बंगाली असल्यामुळे जया बच्चन तिला सून बनवण्यासाठी तयार नव्हत्या. मात्र चित्रपट रिलीज झाल्यानंतर राणी मुखर्जीचे कुटुंब बच्चन हाउसमध्ये गेले होते. तिथे जया बच्चन यांनी राणीबद्दल असे काही म्हटले जे मुखर्जी कुटुंबाला अजिबात आवडले नाही, अखेर अभिषेकने राणीसोबत ब्रेकअप केले.(bollywood)

असे म्हटले जाते की जया बच्चन त्यांची सून ऐश्वर्या रायसाठी (aishwarya rai bachchan)खूप स्ट्रिक्ट सासू आहे. त्यामुळे बऱ्याचदा त्यांचे जमत नसल्याचेही वृत्त कानावर पडते. ऐश्वर्यासोबत लग्न करण्यापूर्वी अभिषेक बच्चनचे करिश्मा कपूरसोबत साखरपुडा झाला होता. लग्नाच्या निमंत्रण पत्रिकादेखील छापल्या गेल्या होत्या. मात्र नंतर दोन्ही कुटुंबाने लग्न तोडल्याचे जाहीर केले होते. लग्न का तुटले याचे कारण समोर आले नाही.

त्यानंतर अभिषेक आणि राणी मुखर्जी एकमेकांच्या प्रेमात पडले होते. तिच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर अभिषेकच्या आयुष्यात ऐश्वर्या राय आली आणि ते दोघे लग्नबेडीत अडकले. आता त्यांना एक मुलगी आहे जिचे नाव आराध्या आहे. त्या दोघांचा सुखी संसार सुरू आहे.