Main Featured

राज ठाकरेंनी दिली धोक्याची सूचना

raj thackeray
Maharashtra-लॉकडाउनच्या काळात अनेकांवर संकट कोसळलं असून आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. आपल्या मागण्यांसाठी अनेकजण मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची (raj thackeray)भेट घेत असून कृष्णकुंजबाहेर गर्दी करताना दिसत आहेत. दरम्यान बुधवारी पेणमधील मूर्तिकार राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचले होते. केंद्राने प्लास्टर ऑफ पॅरिसवर (plaster of paris)बंदी घातली असल्याने मूर्ती घडवणं कठीण जात असल्याची व्यथा त्यांनी राज ठाकरेंसमोर मांडली. बंदी उठवण्यासाठी मूर्तिकारांनी राज ठाकरेंकडे मदत मागितली आहे.

Must Read

1) आमदारानं 19 वर्षांच्या मुलीशी केलं लग्न

2) मराठमोळी नेहा पेंडसे एथनिक ड्रेसमध्ये दिसते झक्कास..! Photos

3) राजस्थान रॉयल्सच्या कर्णधाराला 12 लाखांचा दंड

4) शिक्षक भरती घोटाळ्यात भाजपा नेत्याला अटक

5) Video: १०३ वर्षीय आजोबांनी १४ हजार फुटांवरुन मारली उडली


राज ठाकरे (raj thackeray) यांनी मात्र यावेळी मूर्तिकांना प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीच्या जागी शाडूच्या मूर्ती करण्याचा सल्ला दिला. “प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे (plaster of parisनदी, समुद्र यात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं. विसर्जनानंतर चौपाट्यांवर त्यावर असंख्य गणपतीच्या मूर्ती दिसतात. हे चित्र फार भीषण असतं. 

इतक्या श्रद्धेने ज्या गणपती बाप्पाची पूजा, विसर्जन करतो तीच मूर्ती किनाऱ्याजवळ असलेलं दृष्य बघायला खूप विदारक असतं. त्यामुळे शक्य असेल तितक्या शाडूच्या किंवा मातीच्या मूर्ती बनवणं हे जास्त संयुक्तिक असेल,” असं राज ठाकरे यांनी मूर्तिकारांना सांगितलं.

राज ठाकरेंनी मूर्तिकांना वेगळा विचार करुन पाहण्याचा सल्ला दिला आहे. यावेळी त्यांनी उद्या जर परदेशातून मूर्ती आल्या तर तुम्ही काहीही करु शकत नाही अशी धोक्याची सूचनाही दिली. राज ठाकरेंनी यावेळी मूर्तिकारांना पर्यायी मार्गाचा विचार करण्याचा सल्ला देताना आपण समुद्रात विसर्जनासाठी काही वेगळा पर्याय उपलब्ध होईल का यासंबंधी सरकारमधील व्यक्तीशी चर्चा करु असं आश्वासन दिलं.