china pubg game
चीनविरोधात (china)आक्रमक भूमिका घेत केंद्र सरकारने चिनी कंपन्यांशी संबंध असणाऱ्या PUBG Game सह ११८ मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी आणली होती. भारतात तीन कोटींहून आधिक युजर्स असलेले पबजी पुन्हा एकदा एण्ट्री करणार आहे. 

दक्षिण कोरियाई कंपनी पबजी कॉर्पोरेशन (PUBG Corporation) भारताता पुन्हा एकदा पबजी मोबाइल गेम सुरु करण्यासाठी प्रयत्न करत आहे. Reliance Jio नंतर आता टेलीकॉम कंपनी Airtel सोबत चर्चा सुरु असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.

Must Read

1) मराठा संघटनांकडून उद्याचा महाराष्ट्र बंद मागे

2) आता येतंय Green Ration Card

3) टीव्ही टीआरपी रॅकेटचा पर्दाफाश; ‘रिपब्लिक’सह ३ चॅनल्सची चलाखी

4) क्रीडा विभागातून कुस्तीपटू बबीता फोगटचा राजीनामा

5) COVID-19 : मॉडर्ना कंपनीने कोरोना लशीसंदर्भात घेतला मोठा निर्णय


PUBG Game ला भारतात माघारी आणण्यासाठी PUBG कॉर्पोरेशन Airtelसोबत बोलणी करत आहे. सध्या दोन्ही कंपन्यामध्ये चर्चा सुरु आहे. पबजी कंपनी चार ते सहा वर्ष अनुभव असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा शोध घेत असून मुलाखती सुरु आहेत.

एअरटेल किंवा पबजी यांच्याकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. तसेच Google Play Store किंवा Apple App Store वर हे अॅप कधी उपलबद्ध होणार याचीही माहिती अद्याप मिळाली नाही

भारतात पबजी मोबाइलवर बंदी घातल्यानंतर दक्षिण कोरियाई कंपनी पबजी कॉर्पोरेशनने चीनी कंपनी टेनसेंटसोबतचं नातं तोडलं होतं. असे म्हटलं जातेय की, कंपनीने चीनी कंपनी टेनसेंट गेम्सचे सर्व पब्लिश राइट्स संपवले होते. PUBG कॉर्पोरेशन दक्षिण कोरियाई वीडियो गेम कंपनी Krafton Game Union ची सहायक कंपनी आहे.