नाटक, चित्रपट या माध्यमात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात प्रिया बापटने Priya bapat वेगळे स्थान निर्माण केले आहे.

करिअरची सुरुवात केल्यापासून प्रियाने आतापर्यंत तिच्या यशाचा आलेख कायम उंच ठेवला आहे.
तिला आज मराठी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावंत अभिनेत्रींपैकी एक समजले जाते. 
प्रियाने नुकतेच साडीतील फोटो शेअर केले आहेत. तसेच तिने तिच्या सोलो फोटोसोबत उमेश कामतसोबतही फोटो शेअर केला आहे.
प्रिया बापट सोशल मीडियावरही बरीच अ‍ॅक्टिव्ह आहे. 
ती नेहमी आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते.
याशिवाय नेहमी ती सोशल मीडियावर फोटोजही शेअर करत असते. 
या फोटोंतून ती प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडताना पहायला मिळते. 
'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी सिनेमांमध्ये तिने काम केले आहे.