president-rule-in-maharashtraगेल्या काही दिवसांपासून स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा ( Kunal Kamra चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी त्याने शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची मुलाखत घेतली. यावेळी त्याने संजय राऊत यांना एक जेसीबीची प्रतिकृती भेट स्वरूपात दिली. लवकरच कुणाल कामरा आणि संजय राऊत यांची मुलाखत ‘शट अप या कुणाल’ या पॉडकास्टच्या माध्यमातून प्रदर्शित होणार आहे. आता देखील कुणालने संजय राऊत यांना टॅग करत एक ट्विट केलं. मला महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट चालेल. असं वक्तव्य त्याने सोशल मीडियावर केलं. सध्या त्याचं हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

Advertise

Must Read

1) कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन आता सोशल मिडीयावर

2) राज्यपालांचा पॉलिटीकल एजंटसारखा वापर; राऊतांचा टोला

3) प्रत्येक स्त्रीमध्ये आहे 'दुर्गा'; लक्षवेधी रुपातील 'या' अभिनेत्रीला ओळखलं का?

4) WhatsApp मध्ये समस्या आल्यास आता तक्रार थेट कंपनीकडे करा

5) न्यूडल्स तयार करता करता तरुणीनं केला भन्नाट डान्स, VIDEO पाहून व्हाल हैराण

ट्विट करत तो म्हणाला, 'ज्या दिवशी संजय राऊत राष्ट्रपती असतील, त्या दिवशी मला महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली तरी चालेल. 'असं कुणाल कामरानं म्हटलं आहे. दरम्यान राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक चर्चांवर वाद सुरू आहे. शिवाय सरकारच्या कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अभिनेत्री कंगना रानौतसह अनेकांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. 

तर कुणाल कामराच्या या अटीनंतर काय पडसाद उमटतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आपल्या चौकटीबाहेरील आणि विशेषत: राजकीय परिस्थिवर उपरोधिक टीका करत भाष्य करत विनोद सादर करण्याची कुणालची शैली विशेष चर्चेचा मुद्दा ठरते.   

मुख्य म्हणजे आता शिवसेना नेते संजय राऊत यांची मुलाखत किती घेताना कुणाल कामरा त्यांची किती फिरकी घेणार आणि संजय राऊत त्याच्या या प्रश्नांना शिवसेना स्टाईलनं कशी उत्तरं देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.