Main Featured

एक राजा बिनडोक तर दुसरा.., प्रकाश आंबेडकरांची उदयनराजे-संभाजीराजेंवर जहरी टीका


 

prakash-ambedkar-on-mp-udaynraje-bhosale

indian politics latest news : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी गुरूवारी पुण्यात मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे वंचित बहुजन आघाडीनं मराठा समाजाच्या मोर्चाला पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, ही घोषणा करताना प्रकाश आंबेडकर यांनी खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर जहरी टीका केली आहे. उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे यांचा नामोल्लेख न करता 'एक राजा बिनडोक आहे, तर दुसऱ्यांचं आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर भर. राज्यसभेत कसं पाठवलं याचं आश्रर्य वाटतं, अशा शब्दांत प्रकाश आंबेडकर यांनी घणाघात केला आहे.

Advertise

Must Read

1) केंद्रीय मंत्री नितिन गडकरींचे खासदार डॉ. कोल्हे यांना पत्रकारण...

2) ...तर फडणवीसांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेण्याचा मार्ग मोकळा

3) चीनला भारी किंमत चुकवावी लागेलट्रम्प यांचं मोठं विधान

4) राज्यात चालवणार ५ विशेष रेल्वेमध्य रेल्वेचा निर्णय

5) MPSCच्या परीक्षांबाबत मुख्यमंत्री घेणार अंतिम निर्णय

मराठा आरक्षणासाठी 10 तारखेला काढण्यात येणाऱ्या मोर्चाला वंचित आघाडीचा पांठिबा राहिल, असं प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलं आहे. पाठिंबा देण्यासाठी सुरेश पाटील यांनी आपल्याकडे विनंती केली होती. मराठा आरक्षण वादामुळे महाराष्ट्राचं सामाजिक स्वास्थ बिघडू नये, असंही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर, सगळ्यांचं आरक्षण रद्द करा, असं वक्तव्य उदयनराजे यांनी केलं होतं. त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी उदयनराजे यांचा समाचार घेतला आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, मी कोणाला घाबरत नाही, ज्या माणसाला घटना माहीत नाही, म्हणूनच आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर सगळ्यांचं आरक्षण रद्द करा, असं ते म्हणतात.

आणखी काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं की, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सुरेश पाटील यांच्याशी बोलणं झालं आहे. 10 ऑक्टोबरच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा असेल. मराठा आरक्षण वेगळं आणि ओबीसी आरक्षण वेगळं, कोणत्याही परिस्थितीत ओबीसींच्या आरक्षणात मागणी करु नका, ही त्यांना विनंती केली आहे. सामंजस्य बिघडताना दिसत आहे.

आरक्षण संघर्ष समिती किंवा इतर जणांना सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापर्यंत थांबण्याची विनंती करण्यात आली आहे. मात्र, त्यात फाटे फोडण्याचा प्रयत्न करुन मराठा संघटनांत कलह होण्याची शक्यता दिसत आहे.

त्यातून आक्रमक भूमिका घेऊन महाराष्ट्रातील सामंजस्य बिघडू नये, असं मत देखील प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी व्यक्त केलं आहे. दोन्ही पक्षांनी ठाम राहावं सामंजस्य आणि शांतीचं वातावरण राहील. ओबीसीं (Other Backward Classच्या आरक्षणाला धक्का लावू नका, अशी आमची भूमिका जाहीर केल्याची प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सांगितलं. एसबीसी पूर्वीही होती. फक्त शिक्षण क्षेत्रात होती. एसटी-एससीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप मिळत नव्हती. त्यामुळे त्यांना फ्री शीप मिळत होती.

नंतर आर्थिक निकषावर फ्री शीप देण्यात आली. त्याचा सगळ्यांनाच फायदा झाला. मात्र, मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, त्यामुळे त्यांना एसबीसीमध्ये आरक्षण मिळू शकत नाही. ही शासनाची अट चुकीची असून घटनेला धरून नाही. आरक्षण कुणाला द्यायचं कुणाला नाही, हा राज्याचा अधिकार नाही, तो केंद्राचा अधिकार असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी यावेळी सांगितलं.

टीका कदापि सहन करणार नाही...

दुसरीकडे, खासदार उदयनराजे भोसले (MP Udayan Raje Bhosale) हे बिनडोक आहेत. त्यांना भाजपने कसं काय खासदार केलं अशा प्रकारचं आक्षेपार्ह वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. त्यानंतर राज्यभर याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. यावर राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

छत्रपती घराण्याचे वंशज उदयनराजे भोसले यांच्या बद्दल केलेले वक्तव्य निंदणीय आहे. संपूर्ण राज्यात छत्रपतींच्या गादीला मानणारे लोक आहेत. साताऱ्याच्या गादीचा अवमान खपवला जाणार नाही. त्यांच्यावरील टीका कदापि सहन केली जाणार नाही. त्यांच्यावरील ही टीका गैर आणि चुकीची असल्याच आहे, असं शंभूराजे देसाई यांनी म्हटलं आहे.