CM Uddhav Thackeray


politics- शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray)यांनी दिलेला स्वबळाचा नारा ही वादळापूर्वीची शांतता असू शकते असं वक्तव्य भाजपाचे नेते आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. “शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बाबरी मशीद पाडल्यानंतर ती माझ्या शिवसैनिकांनी पाडली असं गर्वाने सांगितलं होतं. मात्र उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं आहे. तसंच सत्ता टिकवण्यासाठी सगळी तत्वे गुंडाळून ठेवली आहेत.” असंही राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

एवढंच नाही तर केंद्र सरकारवर सातत्याने करण्यात येणाऱ्या टीकेवरुनही राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. “केंद्र सरकारवर टीका करणं म्हणजे स्वतःचं अपयश झाकायचं आणि केंद्राकडे बोट दाखवायचं असा प्रकार आहे. जर तुमच्यात राज्य चालवायची धमक आहे तर मग केंद्राकडे बोट का दाखवता? ” असाही प्रश्न राधाकृष्ण विखे पाटील यांनी विचारला आहे. अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना भेटण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील आले होते. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकार आणि उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली आहे.(politics)

Must Read 


काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

“महाराष्ट्रात शिवसेनेचा एकहाती भगवा फडकेल या दृष्टीने आत्तापासूनच तयारीला लागा” असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मंगळवारी पक्षाच्या जिल्हाप्रमुखांना दिले.

शरद पवार काय म्हणाले होते?

राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख शरद पवार यांनीही उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली होती. “शिवसेनेचा भगवा फडकवा हे भाषण मी गेले ३० ते ३५ वर्षे ऐकतोय आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्याची ही पद्धत आहे” असं शरद पवार यांनी म्हटलं होतं.

मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावरही विखे पाटील आक्रमक झाले होते. “मला आश्चर्य वाटतं की सरकार मंदिरं उघडायला का घाबरतं आहे. यांना परमेश्वराची एवढी भीती का वाटते? तुम्ही मदिरालयं उघडण्यासाठी परवानगी दिली. मात्र मंदिरं उघडण्यासाठी परवानगी देत नाही. त्या त्या भागातील अर्थशास्त्र हे मंदिरांवरती अवलंबून आहे. हा फक्त भावनिक मुद्दा नाही, अनेकांचे रोजगार गेले आहेत. व्यवसाय उद्ध्वस्त झाले आहेत. याचा विचार सरकारने करायला हवा.” असंही पाटील यांनी म्हटलं आहे.