Main Featured

गावठी बनावटीचे पिस्तुल व मॅगझिन : 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त


 

Village-made pistols and magazines

इचलकरंजी येथील इंडस्ट्रीयल इस्टेट परिसरात राहणार्‍या परप्रांतिय युवकाकडून स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने गावठी बनावटीचे पिस्तुल (Village-made pistols)मॅगझिन (Magazine) असा 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नितीनकुमार सिंह (वय 28 रा. इंडस्ट्रीयल इस्टेट मूळ रा. प्यारेपुर सरमेरा बिहार) असे त्याचे नांव आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी बेकायदेशीरपणे शस्त्रास्त्रे बाळगणार्‍यांची माहिती गोळा करण्याचे काम सुरु आहेत. त्या अनुषंगाने तपास सुरु असताना स्थानिक गुन्हा शाखेचे सपोनि विकास जाधव यांना इंडस्ट्रीयल इस्टेट नाईट कॉलेज परिसरातील एक युवक गावठी बनावटीच्या पिस्तुलाची विक्री करणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्याठिकाणी पथकाने छापा टाकून नितीन सिंह याला ताब्यात घेतले. 

Advertise

MUST READ


1) मला तेवढाच उद्योग नाहीय; पार्थ पवारच्या ट्विटवर अजित पवारांची प्रतिक्रिया2) जीएसटी संकलनात १० टक्के वाढ3) लॉकडाऊन काळातील हवाई तिकिटांचे पैसे मिळणार परत4) करोनाचा कहर : उपचार घेणाऱ्या करोना रुग्णांमध्ये पुन्हा वाढ5) एलओसीवर पाकचा गोळीबार; दोन जवान शहीद

त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तुल व मॅगझिन मिळून आले. लॉकडाऊनच्या काळात नितीन हा गावी गेला होता. तेथून परतताना त्याने बिहारमधील मुंगेर जिल्ह्यातील कोठावत येथून हे पिस्तुल आणले असल्याचे सांगितले. त्याला शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ही कारवाई जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार खंडेराव कोळी, पोलिस हवालदार संभाजी भोसले, राजू शिंदे, शहनाज कनवाडे, रणजित पाटील, प्रशांत कांबळे, बालाजी पाटील, रविराज कोळी, संजय इंगवले, फिरोज बेग, महेश खोत, अमर शिरढोणे, आयुब गडकरी, सुरज चव्हाण, संदीप मळघणे, सुजाता पाटील, रुपाली भोये, अरुणा चौगुले आदींच्या पथकाने केली.