Main Featured

आता Paytm वरून पेमेंट करणं महागणार...


 

                                            paytm-wallet-users-will-pay-additional-charges

ग्रॉसरी स्टोर्समधून सामान भरण्यासाठी, पाणी-लाईट बिल भरण्यासाठी, गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी, मोबाईल-डिटीएच रिचार्ज, ऑनलाईन ऑर्डर (Order online) अशा अनेक गोष्टींसाठी पेटीएम वॉलेटचा (Paytm Wallet) वापर अनेक जण करतात. पण आता युजर्ससाठी पेटीएम महाग होणार आहे.आतापर्यंत क्रेडिट कार्डमधून पेटीएम वॉलेटमध्ये मनी लोड केल्यानंतर कोणताही चार्ज द्यावा लागत नव्हता. पण आता कंपनीने नियमांमध्ये काही बदल केले आहेत. 

Advertise

नक्की वाचा 

1) हिमालयात फुलला दुर्मिळ ब्रह्मकमळांचा मळा

2) एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यावरून शिवसेनेमध्ये नाराजी       का?

3) देशाला पहिला ऑस्करचा मान पटकावून देणाऱ्या मराठमोळ्या भानू अथैय्या यांचं निधन

 4)  कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

5) नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांची आॅनलाइन पायाभूत चाचणी

paytmbank.com/ratesCharges वर देण्यात आलेल्या माहितीनुसार, 15 ऑक्टोबर 2020 पासून एखाद्या युजरने पेटीएम वॉलेटमध्ये क्रेडिट कार्ड (Credit cardमधून मनी ऍड केल्यास, त्याला 2 टक्के अतिरिक्त चार्ज द्यावा लागणार आहे. या 2 टक्के चार्जमध्ये जीएसचीचा समावेश असणार आहे. उदा. जर तुम्ही क्रेडिट कार्डने पेटीएम वॉलेटमध्ये 100 रुपये टाकले, तर तुमच्या क्रेडिट कार्डमधून 102 रुपयांचं पेमेंट करावं लागणार आहे. हा नियम आधी 9 ऑक्टोबरपासून लागू होणार होता.