Main Featured

विदर्भात पवार-फडणवीस थाळी, मेन्यू ऐकून तुमच्याही तोंडाला पाणी सुटेल


                                         pawar-nonveg-and-fadnvis-veg  यापूर्वी तुम्ही पुण्या-मुंबईतील सरपंच, आमदार, खासदार, राक्षस या जेवणाच्या थाळ्याची नावे ऐकली  असतील. पण अमरावतीत हॉटेलमध्ये राजकारणातील दोन पॉवर फुल व्यक्तींच्या नावाच्या थाळ्या तयार आहेत. या थाळ्या पाहून तुमच्या तोंडालाही पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) ही दोन्ही नाव म्हणजे महाराष्ट्रच्या राजकारणात पॉवर फुल व्यक्तीमत्व आहेत.  या दोन नावांवरुन असलेल्या जेवणाच्या थाळ्यंची चर्चा सध्या अमरावतीत सुरु आहे. पवार आणि फडवणीस नावाची थाळी नावाप्रमाणेच पॉवर फुल असल्याचे खवयै सांगतात.

Advertise

Must Read

1) कोल्हापुरी! ऑनलाईन दुकानात आता घरबसल्या मिळणार अस्सल कोल्हापुरी चप्पल

2) महाविकासआघाडी सरकार हे बिघाडी सरकार आहे : हर्षवर्धन पाटील

3) प्रेग्नन्सीची न्यूज दिल्यानंतर अनिता हसनंदानी शेअर केले असे PHOTO

4) शुल्लक कारणावरुन रिक्षाचालकाला मारहाण; VIDEO

5) डोक्यात लोखंडी रॉडने वार करत पत्नीला संपवलं

अमरावतीमधील प्रसिद्ध असलेल्या हेरिटेज किचन (Heritage Kitchen) या हॉटेलने एक नवा उपक्रम सुरू केलाय. ज्यात ६०० रुपयात पवार मांसाहारी थाळी तर ४०० रुपयात फडणवीस शाकाहारी थाळी आहे.

सहाशे रुपयांच्या पवार मांसाहारी थाळीमध्ये मटण, चिकन, अंडाकरी, फिश सह एक चिकन बिर्याणी, अनलिमिटेड भाकरी पोळ्या किंवा तंदुरी रोटी मिळते. एवढंच नव्हे तर वरून स्वीट, आईस्क्रीमसुद्धा दिला जातो. तर फडवणीस नावाच्या शाकाहारी थाळीत तीन भाज्या, दालफ्राय, एक स्वीट, आईस्क्रीम, व्हेज बिर्याणी, अनलिमिटेड पोळ्या किंवा भाकरी किंवा तंदूर रोटी मिळते.

पण एकट्या व्यक्तीला ही थाळी मिळणार नाही कारण एकटा माणूस ही खाऊच शकत नाही. अन्न वाय जाऊ नये म्हणून ही थाळी दोघांना संपवावी लागणार आहे. आता सहाशे रुपयात थाळी म्हणू खवय्ये देखील गर्दी करु लागलेयत.पुणे, मुंबई, औरंगाबाद नंतर अमरावतीमध्ये सुरू झालेल्या या थाळी उपकमाला खवय्यांकडुन चांगलाच प्रतिसाद मिळतोय. दोन्ही थाळ्यांमध्ये पोटभर जेवण मिळत असल्याचं समाधान ग्राहकांनी व्यक्त केलं. 

कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा तसं विदर्भाच वऱ्हाडी जेवण प्रसिद्ध आहे. हीच बाब या हॉटेल मालकांनी हेरली आणि त्यातून हा उपक्रम सुरु झाला. आता अनलॉक झाल्याने अमरावतीकर खुमखीत जेवणाचा बेत पवार- फडणवीस थाळीतू पूर्ण करत आहेत.