ecommerce companyफेस्टिव्ह सीजन पाहाता अनेक ई-कॉमर्स कंपन्या (ecommerce company)मोठ्या ऑफर्स, डिस्काउंटसह सेलची घोषणा करतात. पण अशा सेलदरम्यान, ऑनलाईन शॉपिंग (online shopping)करताना सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. शॉपिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या शब्दांचा अर्थ नीट समजून घेणंही महत्त्वाचं आहे. अन्यथा फवणूकीची मोठी शक्यता असते.

कॅशबॅक -

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑनलाईन शॉपिंग (online shopping) वेबसाईट्स कॅशबॅकचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. कॅशबॅक अंतर्गत ग्राहकाला उत्पादनाच्या किंमतीच्या काही टक्के रक्कम परत मिळते. उदा. 5000 रुपयांची खरेदी केल्यास, कॅशबॅक रुपात 10 टक्के म्हणजेच 500 रुपये परत मिळतात.

Must Read

1) उद्योग क्षेत्रातील कामगारांना वेतनवाढ मिळण्याची शक्यता

2) आमिर खानच्या मुलीने दिली इन्स्टाग्रामवर धमकी...

3) अ‍ॅमेझॉन अन् फ्लिपकार्टला मनसेचा इशारा

4) लग्नाचं आमिष दाखवून रेपचा आरोप; मिथुन चक्रवर्ती यांच्या मुलासह पत्नीवर गुन्हा

5) मंत्रालय, स्वारगेट, कोल्हापूर, अलिबागसाठी ५० शिवशाही

6) 'वर्क फ्रॉम होम'मुळे सायबर गुन्ह्यात मोठी वाढ


किती मिळेल कॅशबॅक -

कोणतीही वस्तू खरेदी करताना, कॅशबॅकच्या नियम-अटी लक्षपूर्वक वाचणं गरजेचं आहे. सामान्यपणे, ऑनलाईन पोर्टलद्वारा, देण्यात येणारे कॅशबॅक नियम-अटींच्या आधारे असतात. कॅशबॅक किती आहे, तेही तपासणं आवश्यक आहे, अनेकदा यात किमान खरेदी रकमेची अट असते. उदा. ऑफरमध्ये 20 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक दाखवू शकतात, परंतु यात अधिकाधिक 1000 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळण्याची मर्यादा असू शकते. म्हणजे 1000 हून अधिक कॅशबॅक दिला जाणार नाही. त्यामुळे कॅशबॅकसारखे प्रकार नीट तपासणं गरजेचं आहे.

कधी मिळेल कॅशबॅक -

कॅशबॅक कधी मिळेल याबाबतही माहिती असणं महत्त्वाचं आहे. कधी-कधी 3-4 महिन्यांनी कॅशबॅक दिला जातो. त्याशिवाय, हा कॅशबॅक नेमका कुठे दिला जातो? अनेकदा आपल्या बँक अकाउंटमध्ये कॅशबॅक दिला जात नाही. अधिकतर कंपन्या, आपल्या ऑनलाईन वॉलेटमध्ये कॅशबॅक देतात. त्यामुळे पुन्हा शॉपिंग करताना तो कॅशबॅक वापरात येऊ शकतो.

नो कोस्ट EMI -

फ्लिपकार्ट (flipkart)आणि अमेझॉन (amazon)सेलमध्ये शॉपिंगसाठी नो-कॉस्ट ईएमआयची (No Cost EMI) सुविधा देण्यात आली आहे. No Cost EMIमध्ये शॉपिंग करणं, अधिक महागात पडू शकतं. अशावेळी सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. एका NBFCच्या एग्जिक्यूटिव्हने दिलेल्या माहितीनुसार, No Cost EMIवर प्रोडक्ट संपूर्ण किंमतीवर खरेदी करावं लागतं. त्यावर 15 टक्के व्याजही आकारलं जातं.

-No Cost EMI, सामानाची अधिक विक्री होण्यासाठी वापरला जाणारा पर्याय आहे. त्यामुळे अशी ऑफर पाहून खरेदीची घाई करू नका. त्याबाबत नियम-अटी वाचा. No Cost EMI स्किम साधारणपणे 3 पद्धतीने काम करते.

-No Cost EMIवर प्रोडक्ट पूर्ण किंमतीत खरेदी करावं लागतं. यात कंपन्या ग्राहकांना दिला जाणारा डिस्काउंट, बँकेला व्याजाच्या स्वरूपात देते.

- कंपनी व्याजाची रक्कम आधीच प्रोडक्टच्या किंमतीत सामिल करते.

- ज्यावेळी एखादं प्रोडक्ट विकलं जात नसेल, त्यावेळी ते काढण्यासाठीही कंपनीकडून No Cost EMIचा वापर केला जातो.

त्यामुळे No Cost EMIवर सामान घेताना, इतर ऑनलाईन साईट्स आणि ऑफलाईन किंमत जाणून घ्या. यासंदर्भात नियम-अटी लक्षपूर्वक वाचा.

हे वाचा - Paytm मधून पैसे कट, पण ट्रान्झेक्शन फेल; डोंट वरी असे मिळतील संपूर्ण पैसे

डिस्काउंट -

अनेक ऑनलाईन कंपन्या (ecommerce company) सेलमध्ये 80 टक्के डिस्काउंटचा दावा करतात. पण हे डिस्काउंट सगळ्या प्रोडक्टवर नसतात. जुना स्टॉक संपवण्यासाठीही ही ऑफर वापरली जाते. त्यामुळे अधिक डिस्काउंट असलेल्या वस्तू घेताना त्या सावधगिरी बाळगून घेणं गरजेचं आहे. वस्तू घेताना डिस्काउंटच्या जाळ्यात न फसता इतर ऑनलाईन साईट्स आणि ऑफलाईनही त्यांची किंमत काढा, तुलना करुन मगच खरेदी करा.