online-food-delivery-site

आजकालच्या व्यस्त जीवनात ऑनलाइन Online फूड मागवणे अनेकांचा जेवण बनवायचा वेळ वाचवत आहे, अनेकांना चमचमीत खायला मिळत आहे तर घराबाहेर राहणाऱ्या मुलामुलींना चवदार अन्न देत आहे. पण अशाप्रकारे खाद्यपदार्थ मागवताना केलेली एक छोटीशी चूक देखील महागात पडू शकते. जर तुम्ही संबंधित फूड कंपनीचा नंबर गुगलवर शोधून तो डायल करत असाल किंवा कोणतेही अॅप तुमच्या फोनमध्ये डाऊनलोड करत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण ही चूक तुमचे संपूर्ण खाते रिकामे करू शकते. मीडिया अहवालातील माहितीनुसार नोएडामध्ये एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या महिला सॉफ्टवेअर इंजीनिअरला अशाप्रकारे बर्गर मागवणं महाग पडलं आहे. ही ऑर्डर केल्यानंतर तिच्या खात्यातून 21,865 रुपये काढण्यात आले आहेत आणि या बर्गरची किंमत अवघी 178 रुपये होती.

कशी कापली गेली एवढी मोठी रक्कम?

नोएडा सेक्टर 45 मधील एका महिलेने 178 रुपये प्रीपेड पेमेंट करून एक बर्गर ऑर्डर केला होता. 35 मिनिटांमध्ये त्याची डिलिव्हरी होणार होती. मात्र दीड तास झाला तरी ती डिलिव्हरी झाली नाही. त्यामुळे तिने संबंधित रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्याशी चॅटवरून बातचीत केली तेव्हा तिला असे सांगण्यात आले की ऑर्डर रद्द केली गेली आहे. हे संपूर्ण प्रकरण रिमोट कंट्रोल असणाऱ्या App शी संबंधित आहे.

Must Read 

1) 'सिंघम'ची हिरोईन अडकली लग्नाच्या बेडीत PHOTO VIRAL

2) राज्य सरकारकडून रेल्वे प्रवासासाठी ॲॅप

3) रिपब्लिक टीव्हीला पुन्हा बजावली नोटीस

4) ‘तारक मेहता’च्या ‘गोगी’ला जीवे मारण्याची धमकी

5) तुमची कंगना तर आमची उर्मिला !

6) 'आशिकी गर्ल'चं बॅकलेस फोटोशूट सोशल मीडियावर तुफान व्हायरल

यानंतर महिलेन रिफंड मिळवण्यासाठी गुगलवर संबंधित कंपनीच्या कस्टमर केअरचा नंबर शोधला आणि त्यावर कॉल केला. कॉल उचलणाऱ्या व्यक्तीने तो त्या कंपनीचा कर्मचारी असल्याचे सांगितले. त्याने महिलेस असे सांगितले की, तो कॉल मॅनेजर लेव्हलच्या एक्झिक्यूटिव्हला ट्रान्सफर करत आहे. त्याने तिला एक अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले आणि त्यानंतर पैसे मिळतील असेही सांगितले. ते अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर महिलेच्या खात्यातून 21,865 रुपये कापले गेले. संबंधित महिलेने सायबर फ्रॉड अंतर्गत तक्रार दाखल केली आहे.

अशाप्रकारच्या घटना लॉकडाऊन काळात वारंवार समोर येत आहेत. अशावेळी एक ग्राहक म्हणून आपण सतर्क राहणे गरजेचे आहे. सरकार त्याचप्रमाणे देशातील विविध बँकांनी देखील याबाबतचे अलर्ट जारी केले आहेत. त्याचप्रमाणे थेट गुगलवरून कस्टमर केअर क्रमांक डायल करणे तुम्ही टाळू शकता. संबंधित कंपनीच्या वेबसाइटवरून तुम्हाला योग्य क्रमांक उपलब्ध होईल.