Main Featured

OnePlus 8T भारतात लॉन्च, 39 मिनिटात होणार फूल चार्ज


                                          oneplus-8t-launched-in-india

वनप्लस (OnePlus) 8 टी स्मार्टफोन भारतीय बाजारात दाखल झाला आहे. वनप्लसचा हा नवीन फोन 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट डिस्प्ले आणि 65 वॅट फास्ट चार्जिंग सपोर्टसह बाजारात आला आहे. यात क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे. वनप्लस 8 टी दोन रूपांमध्ये बाजारात आणला गेला आहे.

वनप्लस 8 टी या फोनमध्ये 8 जीबी रॅम + 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. या व्हेरिएंटची किंमत 42,999 रुपये आहे. त्याचबरोबर 12 जीबी रॅम + 256 जीबी इंटरनल स्टोरेजच्या मॉडेलची किंमत 45,999 रुपये आहे. 8 जीबी रॅम मॉडेल एक्वामारिन ग्रीन आणि लूनर सिल्व्हर कलरमध्ये उपलब्ध आहे, तर 12 जीबी रॅम मॉडेल केवळ एक्वा मरीन कलरमध्ये उपलब्ध आहे.

Advertise

Must Read

1) कोल्हापुरात मुसळधार; पंचगंगेच्या पातळीत वाढ

2) SBI चा इशारा ! सणासुदीच्या दरम्यान गायब होऊ शकतात तुमच्या अकाऊंटमधील पैसे

3) सतत ‘सेल्फी’ घेता ? ‘हा’ गंभीर आजार तर नाही ना ? या 4 गोष्टी लक्षात ठेवा

4) ही आहेत 5 बेस्ट झिरो बॅलन्स बचत खाती

वनप्लस 8 टीची विक्री 17 ऑक्टोबरपासून सुरू होईल. (Amazon), वनप्लस इंडिया वेबसाइट आणि ऑफलाइन स्टोअरमधून हा फोन खरेदी करता येईल. Amazon प्राईम आणि वनप्लस रेड केबल क्लबच्या मेंबर्सला 16 ऑक्टोबरपासून हा फोन खरेदी करता येणार आहे. 

लॉन्च ऑफर्सबद्दल बोलायचं झालं तर, अॅमेझॉनला एचडीएफसी बँक (HDFC Bank) कार्डद्वारे पेमेंट केले तर यावर 10% लगेचच सवलत मिळेल. याशिवाय वनप्लस इंडिया वेबसाईट आणि ऑफलाईन स्टोअरमध्येही हा फोन उपलब्ध असेल.

वनप्लस 8 टी अँड्रॉइड 11 बेस्ड ऑक्सीजनओएस 11 वर काम करतो. यात 120 एचझेड रिफ्रेश रेटसह 6.55 इंचाचा फुल एचडी + फ्युलेड एमोलेड डिस्प्ले आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर आणि 12 जीबी रॅम आहे.

वनप्लसच्या या लेटेस्ट फोनमध्ये मागच्या बाजूला चार कॅमेरे देण्यात आले आहेत. यात 5 मेगापिक्सलचा प्राथमिक सेन्सर, 5 मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा मोनोक्रोम सेन्सर असलेले आणि 16 मेगापिक्सलचे अल्ट्राव्हायोलेट एंगल लेन्स समाविष्ट आहेत. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील बाजूस 16-मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

वनप्लस 8 टी मध्ये इंटरनल स्टोरेज 256 जीबी पर्यंत आहे. फोनमध्ये 4500mAh बॅटरी आहे, जी 65 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीचा असा दावा आहे की, बॅटरी केवळ 39 मिनिटांत पूर्ण चार्ज होईल आणि 15 मिनिटांत 58 टक्के चार्ज होईल.