मॉन्सूनच्या (monsoon) परतीचा प्रवास लांबल्याने आॅक्टोबर महिन्यात यंदा सातत्याने पावसाचा अनुभव आला. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले. जमिनीतील ओलावा आणि ढगाळ वातावरण यामुळे गतवर्षीप्रमाणे यंदाही आॅक्टोबर हिट जाणवलाच नाही. २८ आॅक्टोबरला देशभरातून मॉन्सूनने एक्झिट घेतल्यानंतर आता थंडीची चाहूल लागली असून रात्रीच्या तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे.

Must Read

1) अनिल अंबानी यांचे मुख्यालय जाणार येस बँकेच्या ताब्यात

2) अल्पवयीन मुलीवर पुण्यात सामूहिक बलात्कार

3) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जमीन घोटाळा केल्याचा गंभीर आरोप

4) PHOTOS: 'मिर्झापूर 2' मधील डिप्पी खऱ्या आयुष्यात आहे भलतील ग्लॅमरस, See Pics

5) टवटवीत आणि चमकदार त्वचेसाठी नियमित करा फक्त 6 योगासनं


राज्यात सर्वाधिक कमाल तापमान रत्नागिरी येथे ३५.३ अंश सेल्सिअस तर सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे १५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.कोकण गोव्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात किंचित घट झाली आहे. मध्य महाराष्ट्रातील बहुतांश शहरातील किमान तापमानात किंचित घट झाली आहे. मराठवाडा व कोकणातील काही ठिकाणच्या किमान तापमानात सरासरीपेक्षा घट होण्यास सुरुवात झाली आहे.

१ नोव्हेंबर रोजी कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.पुणे शहरात शनिवारी कमाल तापमान३१.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले असून किमान तापमान १५.२ अंश सेल्सिअसाची नोंद झाली आहे. कमाल तापमान अधिक असले तरी किमान तापमानात सरासरीपेक्षा १़२ अंश सेल्सिअसने घट झाली आहे़ पुढील ३ दिवस कमाल व किमान तापमान अनुक्रमे ३१ आणि १६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.