not-first-session-exam

संकट काळात शाळांमध्ये बोलावून तथा मुले एकत्रित येतील, अशा पध्दतीने कोणतीही परीक्षा घेऊ नये, अन्यथा त्याला संबंधित मुख्याध्यापक जबाबदार असतील, असे आदेश शिक्षण Teaching विभागाने यापूर्वीच दिले आहेत. या पार्श्‍वभूमीवर दरवर्षी दिवाळीपूर्वी होणारी प्रथम सत्र परीक्षा यंदा होणार नसून त्याबाबत शालेय शिक्षण विभाग सरकारला अहवाल देणार आहे.

दरवर्षी 15 जूनला शाळा सुरु झाल्यानंतर ऑगस्टमध्ये प्रथम घटक चाचणी तर दिवाळीपूर्वी प्रथम सत्र परीक्षा घेतली जात होती. त्यानंतर जानेवारीत दुसरी घटक चाचणी तर मार्चमध्ये द्वितीय सत्र परीक्षा घेऊन उन्हाळी सुट्टी सुरु दिली जात होती. यंदा कोरोनामुळे शैक्षणिक वर्ष 15 जूनपासून सुरु झाल्याची औपचारिक घोषणा झाली. परंतु, लेखी आदेश नसल्याने संभ्रमात सापडलेल्या पुणे बोर्डाचे दहावी- बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रकही लांबणीवर पडले. तत्पूर्वी, राज्यातील एक लाख आठ हजार शाळांअंतर्गत दोन कोटी 24 लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एवढ्या मोठ्या संख्येतील विद्यार्थ्यांची शाळांमध्ये बोलावून परीक्षा घेणे सद्यस्थितीत धोकादायक मानले जात आहे. पालकांनीही त्यासाठी संमती दिलेली नाही. त्यामुळे प्रथम घटक चाचणी व प्रथम- द्वितीय सत्र परीक्षा रद्द करुन थेट वार्षिक परीक्षाच घेण्याच्या निर्णयावर विचारविनिमय सुरु आहे.

Must Read 

परिस्थिती पाहून सरकारला जाईल अहवाल
राज्यातील शाळांमधील सुमारे सव्वादोन कोटी मुले कोरोनाच्या संकटामुळे ऑनलाईनच्या माध्यमातून घरी बसून शिक्षण घेत आहेत. कोरोनाचा धोका अद्याप टळला नसल्याने या विद्यार्थ्यांची परीक्षा दिवाळीपूर्वी घेणे शक्‍य नाही. परीक्षा घेण्यासंदर्भात शिक्षण विभागाकडून राज्य सरकारला पत्र पाठवून अभिप्राय घेतला जाईल. त्यानंतरच परीक्षांचे नियोजन शाळांना काही दिवसांपूर्वी कळविण्यात येईल. 
दिनकर पाटील, संचालक, शालेय शिक्षण

दहावी- बारावीच्या बोर्ड परीक्षा आनलाईन?
दरवर्षी दहावी- बारावीसाठी साधारणपणे 35 लाखांपर्यंत मुले प्रवेशित असतात. या मुलांना आता ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. एवढ्या मोठ्या विद्यार्थ्यांची सोशल डिस्टन्स ठेवून शाळांमध्ये बोलावून प्रात्यक्षिक आणि वार्षिक परीक्षा घेणे अशक्‍य मानली जात आहे. अद्याप कोरोनाचा धोका टळलेला नसून लसही उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे पुणे बोर्डाने सार्वजनिक आरोग्य विभागाचा अभिप्राय मागविला आहे. त्यानुसार त्यांच्या ऑनलाइन परीक्षा घेता येतील का, याची चाचपणी आता सुरु झाल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.