बॉलिवूडची (bollywood)प्रसिद्ध अभिनेत्री नोरा फतेहीने सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने रसिकांवर मोहिनी घातली आहे. नोराचे फॅन्स (nora fatehi) तिच्या डान्ससोबतच अदा आणि स्टाईलवर फिदा असतात. सोशल मीडियावरही (social media)ती सक्रीय असते. 

आपले ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ फॅन्ससह शेअर (instgram post) करत असते. ती आपल्या फॅन्सना कधीही निराश करत नाही. दिवसागणिक हटके स्टाइलिश आणि तितकेच फॅशनेबल फोटो तसंच व्हिडीओत सोशल मीडियावर धुमाकुळ घालत असतात. तिचा प्रत्येक व्हिडीओ फॅन्ससाठी खास असतो. त्यावर ते भरभरून लाइक्स आणि कमेंट्स देतात. 


Must Read

1) कोल्हापुरी! ऑनलाईन दुकानात आता घरबसल्या मिळणार अस्सल कोल्हापुरी चप्पल

2) महाविकासआघाडी सरकार हे बिघाडी सरकार आहे : हर्षवर्धन पाटील

3) प्रेग्नन्सीची न्यूज दिल्यानंतर अनिता हसनंदानी शेअर केले असे PHOTO

4) शुल्लक कारणावरुन रिक्षाचालकाला मारहाण; VIDEO

5) डोक्यात लोखंडी रॉडने वार करत पत्नीला संपवलं


नुकताच नोरा फतेहीचा आणखी एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती लाल रंगाच्या ड्रेसमध्ये ''कमरिया'' गाण्यावर ठेका धरताना दिसते.व्हिडिओमध्ये नोरा फतेहीची डान्स मुव्हज आणि तिच्या अदा पाहण्यासारखी आहे. नोरा फतेहीचा हा व्हिडिओ तिच्या फॅन्स पेजने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर (instgram post) केला आहे, नोराचा हा व्हिडीओ आतापर्यंत 44 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.




मलायका अरोराच्या
कोविड -१९ पॉझिटिव्हनंतर अभिनेत्री नोरा फतेहीने भारताच्या बेस्ट डान्सर शोमध्ये स्थान मिळवले. अभिनेत्रीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर,अजय देवगणच्या 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' चित्रपटात ती झळकणार आहे. या चित्रपटात नोरा डान्सने रसिकांची मनं जिंकणार आहे.  'दिलबर', 'कमरिया',  'साकी साकी' आणि 'एक तो कम जिंदगानी' या गाण्यांनी नोरा फतेहीने बॉलिवूड जगात आपले एक वेगळे स्थान निर्माण केली आहे. 

तिच्या एक तो कम जिंदगानी या गाण्याला एक वर्षे पुर्ण झाले आहेत. त्यानिमित्ताने तिने आता या गाण्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तिने या गाण्याच्या रिहर्सल व्हिडिओसोबत फोटोदेखील इंस्टाग्रामवर स्टोरीवर शेअर केले आहेत. 'सत्यमेव जयते' सिनेमात नोरा फतेहीने सुष्मिता सेनचा सुपरहिट 'दिलबर गाण्याच्या रिक्रेअट व्हर्जनमध्ये डान्स केला होता. 

हे गाणेही प्रचंड हिट ठरले.रसिकांनीही गाण्याचे आणि नोराचे खूप कौतुक केले.यानंतर नोराने अनेक सिनेमांमध्ये आयटम डान्स केले आहेत. त्यापैकी मरजावां सिनेमातील गाणं एक तो कम जिंदगानीदेखील खूप गाजले होते आणि या गाण्याला आता एक वर्षे पूर्ण झाले आहे.

नोरा फतेही (nora fatehi) काही दिवसांपूर्वी ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ या शोमध्ये जजची भूमिका साकारताना दिसली होती. यादरम्यानचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता आणि हा व्हिडीओ पाहून नेटक-यांची पुरती सटकली होती. होय, या व्हिडीओत कोरिओग्राफर टेरेंस लुईस नोराला कथितरित्या आक्षेपार्ह पद्धतीने स्पर्श करताना दिसत होता. मग काय नेटक-यांनी टेरेंस लुईसला जबरदस्त ट्रोल केले होते. हे ट्रोलिंग आणि त्या व्हिडीओत आता टेरेंसने पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली होती.