Main Featured

पावसामुळे व्होडाफोन-आयडियाचं ‘नेटवर्क’ कोलमडलं

telecom companyपुण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका देशातील आघाडीची दूरसंचार कंपनी (telecom company) व्होडाफोन-आयडियालाही (Vodafone idea)बसला आहे. पुणे शहर आणि परिसरात बुधवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. यामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचलं असून, याचा फटका आयडिया व्होडाफोन या दोन्ही कंपन्यांनाही बसला आहे. 

पावसामुळे तांत्रिक बिघाड झाल्यानं कंपनीची नेटवर्क (telecom company)सेवा कोलमडली असून, ग्राहकांना त्रासाला सामोर जावं लागत आहे. ग्राहकांनी कंपनीकडे तक्रारी नोंदवल्यानंतर पावसामुळे नेटवर्क सेवेत बिघाड झाल्याचा खुलासा कंपनीकडून करण्यात आला आहे.

Must Read

कोरोनाग्रस्त क्रिस्टियानो रोनाल्डोने तोडला 'नियम'


सध्या राज्यात सर्वत्र पाऊस कोसळत असून, पुण्यात बुधवारी रात्री पावसानं कहर केला. शहरातील जनजीवन पावसामुळे विस्कळीत झालं होतं. त्याचं व्होडाफोन-आयडियाची दूरसंचार सेवा वापरणाऱ्या ग्राहकांच्या समस्येत मोठी भर पडली. पाऊस कोसळत असतानाच ग्राहकांना ‘नो नेटवर्क’चा सामना करावा लागला. राज्यात अनेक ठिकाणी ग्राहकांना या समस्येला सामोरं जावं लागत असून,  नो नेटवर्क’मुळे वैतागलेल्या ग्राहकांनी ट्विटरच्या माध्यमातून कंपनीकडे तक्रारींचा पाऊसच पाडला आहे.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (rohit pawar) यांनीही नेटवर्क प्रॉब्लेमकडे (telecom company) कंपन्यांचं लक्ष वेधलं आहे. “राज्यात सर्वत्र अतिवृष्टी सुरू असल्याने अनेक ठिकाणी मदतीची गरज आहे. अशा स्थितीत वेळीच मदत पोचण्यासाठी संपर्कासाठी मोबाईल कंपन्यांची सेवा विस्कळीत होऊन चालणार नाही. पण काही भागात कॉल ड्रॉप होणं/नेटवर्क न मिळणं या अडचणी येतायेत. मोबाईल कंपन्यांनी याकडं लक्ष द्यावं,” असं आवाहन रोहित पवार यांनी केलं आहे.

पुण्यासह राज्यातील अनेक भागात रात्रीपासून कंपनीचं नेटवर्क (network problem) अनेक भागातून गायब झालं आहे. कंपनीकडून प्रतिसाद मिळत नसल्यानं ग्राहक ट्विटरवरून आपला संताप व्यक्त करताना दिसत आहे.व्होडाफोन नेटवर्क डाऊन झाल्याच्या घटनेवर सोशल मीडियात कमेंटचा पाऊस पडत आहे. त्यावर अनेक मजेशीर मीम्सही तयार करण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे कॉलिंग सेवेसह इंटरनेट सेवाही बंद झाली आहे. ग्राहकांकडून सातत्यानं विचारणा हो असल्यानं आयडिय व्होडाफोननं नेटवर्क प्रॉब्लेमबद्दल (network problem)खुलासा केला आहे. “पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचल्यानं पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. यात कंपनीच्या महत्त्वाची कार्यालयं असलेल्या भागातही अशीच स्थिती असून, त्यामुळे काही ग्राहकांच्या सेवेमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. आमची टीम वेगानं काम करत असून, लवकरच सेवा पूर्वपदावर येईल. ग्राहकांना होत असलेल्या त्रासाबद्दल दिलगीर आहोत,” असं कंपनीनं म्हटलं आहे.