kolhapurkolhapur-
महापालिका आरोग्य कीटकनाशक विभागामार्फत सुरू केलेल्या डेंगी प्रतिबंधात्मक (dengue)मोहिमेत आज ९ प्रभागांतील १२७१ घरांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत २०७५ कंटेनर तपासले. त्यामध्ये ८३ ठिकाणी डेंगी आढळल्या असून, त्या टेमीफॉस हे द्रावण टाकून नष्ट करण्यात आल्या.

शहरातील प्रभाग क्र. १६, १९, २५, ३, ३७, ४५, ६१, ७१  व  ७८ या  ९ प्रभागात डेंगी (dengue) प्रतिबंधात्मक मोहिमेत राबविली. १२७१ घरांची तपासणी केली असता घरातील कंटेनर यामध्ये फ्रीज, बॅरेल, सिंटेक्‍स टाक्‍या, कुंड्या, टायर आदी २०७५ बाबींची तपासणी केली. यामध्ये ८३ ठिकाणी डेंगीच्या अळ्या आढळून आल्या. त्या औषध टाकून नष्ट करण्यात आल्या. तसेच औषध व धूर फवारणीवरही भर दिला आहे.

Must Read

1) सांगलीत आज आपत्ती व्यवस्थापन कक्षासह तीन कामांचे लोकार्पण

2) विराट कोहलीने सांगितलं आरसीबीच्या हरण्यामागचं कारण

3) लवकरच पुरुषांसाठीही गर्भनिरोधक औषध

4) सरकारने लागू केली आरोग्य विम्याची नवी योजना

2) IPL 2020 : बुमराहचा स्पेशल रेकॉर्ड

यापुढेही ही मोहीम अधिक गतिमान केली जाणार आहे. डेंगी प्रतिबंधात्मक मोहिमेत डास अळी सर्वेक्षण औषध फवारणी व धूर फवारणी, तसेच टायर जप्ती मोहीम व शौचालयाच्या वेंट पाइपला जाळी बांधण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. 

तरी नागरिकांनी खबरदारी म्हणून आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळणे व टायर्स नारळाच्या करवंट्या, फुटके डबे जेणेकरून पाणी साठणार नाही, अशा वस्तूंचा त्वरित नायनाट करून डेंगी, चिकुनगुण्या नियंत्रित ठेवण्यास मदत करावी, असे आवाहन आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले.