new-feature-Whatsapp

लोकप्रिय मेसेंजर अॅप Whatsapp जगभरातील युजर्सच्या जीवनातील अविभाज्य घटक बनलं आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. व्हॉट्सअॅपकडून नेहमीच युजर्ससाठी अनेक नवनवीन फिचर्स लॉन्च करण्यात येतात. अशातच अॅपमध्ये लवकरच आणखी एर फिचर लॉन्च करण्यात येणार आहे. ज्यामुळे युजर्स एकमेकांच्या अगदी सहज कनेक्ट राहू शकणार आहेत. Whatsapp लवकरच मोबाइलमध्ये नंबर सेव्ह करण्याची प्रोसेस आणखी सोपी करणार आहे.

कॉन्टॅक्ट सेव्ह करणं होणार सोपं
असं सांगण्यात येत आहे की, Whatsapp गेल्या बऱ्याच दिवसांपासून QR code

Advertise

वर काम करत आहे. ज्यामार्फत अगदी सहज मोबाइल नंबर फोनमध्ये सेव्ह करणं शक्य होणार आहे. हे फिचर आल्यामुळे Whatsapp वर नंबर सेव्ह करण्याची पद्धत पूर्णपणे बदलणार आहे. दरम्यान, Whatsappने यावर टेस्टिंग करत हे फिचर वॉट्सअॅप बीचा यूजर्ससाठी गेल्या वर्षीच लॉन्च केलं आहे. रिपोर्टनुसार, लवकरच हे फिचर सामान्य युजर्ससाठीही लॉन्च करण्यात येणार आहे.

कसं करणार हे फिचर काम?
Whatsappच्या वतीने सर्व युजर्सना त्यांचा युनिक QR Coad देण्यात येणार आहे. ज्याला दुसरे युजर्स आपल्या स्मार्टफोनने स्कॅन करून त्यांचा नंबर सेव्ह करू शकणार आहेत. यासाठी युजर्सच्या प्रोफाइलमध्ये Whatsapp एक QR Coad देणार आहे. युजर्स अॅपच्या सेटिंगमध्ये जाऊन या Coad ला पाहू शकणार आहेत.
Settings मध्ये प्रोफाइल नेम आणि फोटोसोबत QR Coad चा पर्याय युजर्सना देण्यात येणार आहे. या QR Coad वर क्लिक केल्यावर My Coad नावाचा एक टॅब युजर्सच्या समोर ओपन होणार आहे. ज्याला युजर्स दुसऱ्यांसोबत शेअरही करू शकणार आहेत. ज्यानंतर SCAN COad चा ऑप्शनही समोर येणार आहे. जो दुसरे युजर्स आपल्या फोन कॅमेऱ्याच्या मदतीने स्कॅन करून त्या युजरचा नंबर आपल्या फोनमध्ये सेव्ह करू शकणार आहेत.