Main Featured

तुमच्या घरातच आहे कोरोनापासून बचावाचा उपाय, जाणून घ्या
कोरोनाव्हायरसपासून (corona) बचावासाठी तुम्ही मास्क, सॅनिटायझरचा वापर करत आहात. मात्र आणखी एक महत्त्वाची आहे ती म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती (immunity).

कोरोना संक्रमण रोखण्यासाठी, कोरोनापासून बचावासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती 
(immunity) वाढवण्यासाठी केंद्रीय आयुष मंत्रालयाने नव्या गाइडलाइन्स जारी केल्या आहेत.
 • दिवसभर गरम पाणी प्या.
 • गरम आणि ताजा आहार घ्या.
 • आहारात हळद, जिरं आणि धने अशा मसाल्यांचा वापर करा.
 • कमीत कमी 30 मिनिटं योगा, प्राणायम, ध्यान करा.
 • मधुमेहींनी शुगर नसलेलं च्यवनप्राश घ्यावं.दिवसातून दोन वेळा हर्बल टी प्या.
 • तुळस, दालचिनी, काळी मिरी, सुंठ आणि मणुका यांचा काढा बनवून पिऊ शकता.
 • 150 मिलीलीटर गरम दुधात अर्धा चमचा हळद टाकून प्या.
 • सकाळी आणि संध्याकाळी नाकाच्या आत तीळ किंवा नारळाचं तेल, तूप लावा.
 • कोरडा खोकला असल्यास पाण्यात पुदिन्याची ताजी पानं किंवा ओवा टाकून उकळून घ्या आणि दिवसातून एक वेळा या पाण्याची वाफ घ्या.
 • खोकला आणि घशात खवखव असेल तर दिवसातून दोन-तीन वेळा साखर किंवा मधासोबत लवंग पावडर मिसळून घ्या.
 • कोरोनाची लक्षणं नसलेले किंवा सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांनी अश्वगंधा आणि गुळवेलचं नियमित सेवन करावं.कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांनी नियमित च्यवनप्राश घ्यावं.