Main Featured

Gold Price : नवरात्रौत्सवात जाणून घ्या सोन्याचे नवे दर

gold  silver rate
gold silver rate today- या आठवड्यामध्ये सोन्याचे दर (Gold Price) घसरल्याचे पाहायला मिळाले असले तरीही,  शुक्रवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळाली. त्याआधी सलग 3 दिवस सोन्याचे दर उतरले होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमतीचा सपोर्ट देशांतर्गत बाजारीतल किंमतीना मिळाल्याने सोन्याचे दर वाढले आहे. कोरोनामुळे सर्वत्र अनिश्चितता आहे, काही देशांनी लॉकडाऊन वाढवला आहे. परिणामी सोन्या-चांदीचे दर वाढले आहेत.

Must Read

1) उद्योग क्षेत्रातील कामगारांना वेतनवाढ मिळण्याची शक्यता

2) आमिर खानच्या मुलीने दिली इन्स्टाग्रामवर धमकी...

3) अ‍ॅमेझॉन अन् फ्लिपकार्टला मनसेचा इशारा

4) लग्नाचं आमिष दाखवून रेपचा आरोप; मिथुन चक्रवर्ती यांच्या मुलासह पत्नीवर गुन्हा

5) मंत्रालय, स्वारगेट, कोल्हापूर, अलिबागसाठी ५० शिवशाही

6) 'वर्क फ्रॉम होम'मुळे सायबर गुन्ह्यात मोठी वाढ


सोन्याचे नवे दर (Gold Rates)

सलग तीन दिवस सोन्याचे दर (gold silver rate today)  उतरल्यानंतर शुक्रवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे भाव प्रति तोळा 324 रुपयांने वाढले आहेत. यानंतर सोन्याचे दर 51,704 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. गुरुवारी सोन्याचे दर 51,380 रुपये प्रति तोळा होते. आंतरराष्ट्रीय बाजारात या मौल्यवान धातूची किंमत 1,910 डॉलर प्रति औंस आहे.

चांदीचे नवे दर (Silver Rates)

शुक्रवारी सोन्यापाठोपाठ चांदीमध्ये देखील तेजी पाहायला मिळाली. दिल्लीतील सराफा बाजारत चांदीची किंमत (silver price)1595 रुपये प्रति किलोने वाढून 62,972 रुपये झाली आहे. गुरुवारी चांदीचे भाव 61,374 रुपये प्रति किलो होते. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचे दर 24.35 अमेरिकी डॉलर प्रति औंस आहेत.

सोन्याचे भाव वाढण्याचे कारण

एचडीएफसी सिक्योरिटीजचे सीनियर अनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी सोन्याच्या किंमती का वाढल्या याबाबत दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचे संक्रमण वाढत असल्यामुळे सर्वच देशात अनिश्चितता आहे.  अनेक युरोपिय देशांनी पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवला आहे. परिणामी सोन्या-चांदीचे दर वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय  बाजारात देखील सोन्याचांदीच्या दरात तेजी आहे.