murder case

murder case- शिवसेना माजी शहरप्रमुख व शिवसेना (shivsena) संस्थापक कै. उमेशभाई शेट्टी यांचे पुत्र राहुल उमेश शेट्टी यांची आज सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरासमोर जयचंद चौकात निर्घृण हत्या करण्यात आली.

शेट्टी यांच्या डोक्यावर व मानेवर धारदार शस्त्रांनी वार करत जवळून तीन गोळ्या झाडल्या आहेत. त्यांना तातडीने लोणावळ्यातील परमार रुग्णालयात हालविण्यात आले. दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.दसर्‍याच्या रात्री हनुमान टेकडी येथील गणेश नायडू या युवकांचा देखील धारदार शस्त्रांनी वार करून खून झाल्याची घटना घडली होती. (murder case)


rahul sheti

या दोन्ही घटनांनी लोणावळा शहर हादरून गेले आहे. मागील चार पाच दिवसापुर्वीच लोणावळ्यात सुरज आगरवाल नामक युवकाला दोन गावठी पिस्टल, कोयता व चाकू ह्या हत्यारांसह पकडला होता. एकामागोमाग एक घडलेल्या या घटनांनी लोणावळा शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.दरम्यान शेट्टी यांच्या हत्या प्रकरणी एक प्रत्यक्षदर्शी असून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. परमार रुग्णालयाच्या बाहेर शेट्टी सर्मथकांनी मोठी गर्दी केली होती.

Must Read

1) IPL 2020 साक्षी धोनीची भावनिक पोस्ट

2) एक बेडूक आणि त्याची दोन पोरं; उद्धव ठाकरेंचा राणेंवर हल्ला

3) PHOTOS: ग्लॅमरस अंदाजात दुबईमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते आहना शर्मा

4) IPL 2020: विराटच्या नावे नव्या विक्रमाची नोंद

5) 5 वर्षाच्या चिमुरडीच्या कलेसमोर भलेभले झाले गारद; VIDEO पाहून तुम्ही व्हाल थक्क !

6) पोलॉर्डने सांगितलं मुंबई इंडीयन्सच्या हरण्यामागचं कारण