ms dhoni



भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी (ms dhoni)आणि त्याची पत्नी साक्षी सध्या चर्चेत आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्मवर (ott platform)लवकरच ते आपली एक वेब सीरिज आणण्याच्या तयारीत आहेत. यापूर्वी २०१९ मध्ये ‘Roar Of The Lion’ या डॉक्युमेंट्रीसोबत धोनीनं ‘धोनी एन्टरटेनमेंट’ या प्रोडक्शन कंपनीची सुरूवात केली होती. आता ही कंपनी आपली वेब सीरिज आणण्याची तयारी करत आहे.

ही वेब सीरिज (web series)एका पुस्तकावर आधारित असेल जे अद्यापही प्रकाशित झालेलं नाही. आयएएनएसशी संवाद साधताना साक्षी धोनीनं या वेब सीरिजबद्दल माहिती दिली. मनोरंजन क्षेत्रातील संधीचं सोनं करण्याच्या धोनीच्या निर्णयावर तिनं आयएएनएसशी चर्चा केली.

MUST READ






“मी माझ्या विचारांवर आणि क्रिएटिव्हीटीवर बरंच लक्ष दिलं आहे. जेव्हा आम्ही ‘रोअर ऑफ द लायन’ तयार करत होतो, तेव्हा आम्हाला ही मनोरंजन क्षेत्रात (ott platform)प्रवेश करण्याची ही योग्य संधी आहे असं वाटलं,” अशी माहिती साक्षीनं यावेळी दिली.

ही वेब सीरिज पौराणिक साय-फाय स्टोरी असेल, असंही ती म्हणाली. या प्रोडक्शन हाऊसचं काम साक्षीच पाहत असते. परंतु कोणताही मोठा निर्णय ती महेंद्रसिंग धोनीच्या सल्ल्यानुसार आणि आपल्या टीमच्या सल्ल्यानुसारच घेते.