ms-dhoni-expressing-gratitude

Sports चेन्नई सुपर किंग्जच्या Chennai Super Kings रंगात आपले राहते घर रंगवणाऱ्या फॅनची खुद्द महेंद्रसिंह धोनीने दखल घेतली आहे. तमिळनाडूच्या कुड्डालोर गावातील गोपीकृष्णन धोनीचा मोठा चाहता आहे. धोनी आणि सीएसकेवरील आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी त्याने आपल्या घराला येलो रंगात रंगवले होते. त्याने आपल्या घराचे नाव  'होम ऑफ धोनी फॅन' असे ठेवले होते. घराच्या डेकोरेशनला या घराचा फोटो आता पुन्हा व्हायरल होत आहे.  

या चाहत्याने आपल्या घराच्या भिंतीवर धोनीचे चित्रही रेखाटले आहे. गोपीकृष्णन यांनी आपल्या घराला चेन्नईच्या रंगात रंगवण्यासाठी तब्बल 1.5 लाख रुपये खर्च केला होता. सीएसकेच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन हा फोटो शेअर करण्यात आला आहे. यावर चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने Mahendra Singh Dhoni प्रतिक्रिया दिली आहे.  

 pic.twitter.com/1wxWVnP00l

सीएसकेच्या ट्विटर अकाउंटवरुन धोनीचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात धोनी गोपीकृष्णनचे आभार मानत असल्याचे पाहायला मिळते. चाहत्याने चेन्नईच्या रंगात रंगवलेल्या घराचा फोटे यापूर्वीच इन्टाग्रामवर पाहिला होता. गोपीकृष्णन याने माझ्यासह चेन्नईवरील प्रेम व्यक्त केले. हा निर्णय घेणे सोपी गोष्ट वाटत नाही. घराला दिला जाणारा रंग हा सोशल मीडियावरील पोस्टसारखा बदलता येत नाही. तो कायम राहणार असतो. यासाठी कुटुंबियातील लोकांचीही संमती घ्यावी लागते, असे सांगत धोनीने चाहत्याचे आभार मानले.  

चेन्नई सुपर किंग्जसाठी यंदाचा हंगाम खूपच वाईट राहिला. त्यांनी 12 सामन्यात केवळ 4 विजय मिळवले असून गुणतालिकेत ते तळाला आहेत. आतापर्यंतच्या आयपीएलच्या इतिहासातील त्यांची ही सर्वात खराब कामगिरी आहे.