Main Featured

मंदिरे उघडावीत यासाठी भारतीय जनता पार्टीचे लाक्षणिक आंदोलन


 

                                                         इचलकरंजी येथे भारतीय जनता पार्टी (Bharatiya Janata Party) अध्यात्मिक आघाडीच्या वतीने मंदिरे उघडावीत यासाठी भारतीय जनता पार्टी इचलकरंजी शहराध्यक्ष अनिल डाळ्या यांच्या नेतृत्वाखाली इचलकरंजीमधील गांधी पुतळा येथील हनुमान मंदिरासमोर लाक्षणिक आंदोलन करण्यात आले.

कोरोना काळामध्ये महाभकास आघाडी सरकारने मद्य विक्रीला तसेच, राज्यातील सर्व व्यवसाय व व्यवहारांना परवानगी दिली. परंतु, संताची भुमी असलेल्या या महाराष्ट्र राज्यात गेले कित्येक महिने देवाचे निवासस्थानच बंद आहे,  ठाकरे सरकारला जागे करण्यासाठी व मंदिराचे दरवाजे उघडावेत यासाठी यापूर्वी घंटानाद आंदोलन करण्यात आले होते. मंदिराशी निगडीत असलेल्या व्यवसायधारकांवर म्हणजेच हार फुले, फळे, पूजेचे किरकोळ साहित्य विक्री करणारे विक्रेते यांच्यावर उपासमारीची वेळ या काळात आलेली आहे.

Advertise

Must Read

1) कोल्हापुरी! ऑनलाईन दुकानात आता घरबसल्या मिळणार अस्सल कोल्हापुरी चप्पल

2) महाविकासआघाडी सरकार हे बिघाडी सरकार आहे : हर्षवर्धन पाटील

3) प्रेग्नन्सीची न्यूज दिल्यानंतर अनिता हसनंदानी शेअर केले असे PHOTO

4) शुल्लक कारणावरुन रिक्षाचालकाला मारहाण; VIDEO

5) डोक्यात लोखंडी रॉडने वार करत पत्नीला संपवलं

या सरकारला जनतेशी काहीही सोयरसुतक राहिलेले नाही, अश्या शब्दात राज्य सरकारच्या कार्याचे वाभाडे यावेळी शहराध्यक्षांनी काढले. यावेळी जिल्हा चिटणीस श्रीमती वैशाली नायकवडे, मिश्रीलाल जाजू यांनीही यावेळी मंदिरे उघडण्याची मागणी करत सरकारवर टीका केली. यावेळी  उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, सरचिटणीस अमर कांबळे, अरुण कुंभार, अरविंद शर्मा, राजेंद्र पाटील, धोंडीराम जावळे, दिपक राशिनकर, नगसेवक किसन शिंदे, दिलीप मुथा, अमृता भोसले, प्रदीप धुत्रे, उत्तम विभूते, प्रविण पाटील, सौ. पुनम जाधव, सौ. अश्‍विनी कुबडगे, योगिता दाभोळे, सौ. अलका विभूते, सौ. सरला घोरपडे, किरण दंडगे, सतीश पंडित, विनोद कांकाणी, भरत जोशी, बाळकृष्ण तोतला, अमित जावळे, प्रमोद बचाटे,  राजु भाकरे व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.