more-sastified-in-world-rss-chief-mohan-bhagwatजगात हिंदुस्थानातील मुसलमान सर्वात सुखी आहे असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत  (Mohan Bhagwatयांनी व्यक्त  केले आहे. तसेच बहुसंख्याकांच्या तुलनेत अल्पसंख्य समाजाला अशी चांगली वागणूक देणारा देश जगाच्या पाठीवर अन्यत्र आढळणार नाही असेही मोहन भागवत म्हणाले. 

        Must Read

भागवत म्हणाले की, “ज्या लोकांच्या हितसंबंधांना या एकतेमुळे धक्का पोहोचतो असे लोक वारंवार फुटिरतावाद आणि कट्टरता यांना खतपाणी घालण्याचे उद्योग करत असतात. खरे पाहता आमचाच एकमेव देश असा आहे की जेथे सर्व धर्म, पंथ आणि संप्रदायांचे लोक दीर्घकाळ एकत्र नांदत आहेत. कोणत्या देशातील मुसलमान सर्वांत अधिक सुखी आहेत? तर भारतातील मुसलमानच सर्वांत सुखी आहेत. बहुसंख्याकांच्या तुलनेत अल्पसंख्य समाजाला अशी चांगली वागणूक देणारा देश जगाच्या पाठीवर अन्यत्र आढळणार नाही.”

तसेच धर्मग्रंथातील बर्‍याचशा गोष्टी आता कालबाह्य झाल्या आहेत असेही भागवत म्हणाले, “हिंदुस्थानी समाजाची आपल्या धर्मावर पूर्णपणे श्रद्धा आहे. मात्र तो काळाला सुसंगत असे धर्माचरण करीत असताना दिसतो. त्यांना कोणीही दोष देत नाहीत, अथवा बहिष्कृत करीत नाहीत. कोणीही जुन्या शब्दाला घट्ट चिकटून राहत नाही. देशकालपरिस्थितीनुसार लोक बदल स्वीकारत असतात.” ग्रंथातील शब्दांचा नवा अर्थ सांगावा लागतो अथवा शब्दांमध्ये बदलसुद्धा करावे लागतात असेही भागवत म्हणाले.

“भारतीयांनी या देशातील मुसलमानांना असे कधीच सांगितले नाही की तुम्ही आता तुमच्यासाठी बनलेल्या देशात निघून जावे आणि याउपरही तुम्हाला याच देशात राहायचे असेल हिंदूंच्या नंतर दुय्यम नागरिक म्हणूनच तुम्हाला राहावे लागणार आहे, असे झाले नाही असे भागवत यांनी सांगितले. तसेच आम्ही सर्व भारत राष्ट्र आहोत. जेव्हा सर्वजण आपण भारत आहोत असे म्हणतात तेव्हा लक्षात येते की, भारत म्हणजेच हिंदू होय. ही महत्त्वाची गोष्ट आहे. पण याकरिता त्यांच्यामधूनच प्रबोधन घडून येणे आवश्यक आहे. कारण त्यांनाच ही गोष्ट मान्य करायची आहे. त्यासाठी बाहेरून प्रबोधन करता येणार नाही.” हातात लाठी घेऊन त्यांच्याकडून हे वदवून घेण्याची गरज नाही. हृदयपरिवर्तन घडवून आणले पाहिजे असे प्रतिपादनही भागवत यांनी यावेळी केले.