molestation
kolhapur
- शाहूवाडी तालुक्‍यात बालिकेवर लैंगिक अत्याचार (molestation) झाल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आला. त्याप्रकरणी पोलिसांनी शाहूवाडी तालुक्‍यातीलच यशवंत बापू नलवडे (वय ५५) याला अटक केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी त्याच्याविरोधात पोक्‍सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची फिर्याद पीडित बालिकेच्या आईने दिली आहे. 

या प्रकाराने शाहूवाडी तालुका हादरला आहे. संबंधित बालिकेवर मलकापूर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून बालिकेला सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

 Must Read

1) सांगलीत आज आपत्ती व्यवस्थापन कक्षासह तीन कामांचे लोकार्पण

2) विराट कोहलीने सांगितलं आरसीबीच्या हरण्यामागचं कारण

3) लवकरच पुरुषांसाठीही गर्भनिरोधक औषध

4) सरकारने लागू केली आरोग्य विम्याची नवी योजना

2) IPL 2020 : बुमराहचा स्पेशल रेकॉर्ड

दरम्यान, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर अधीक्षक तिरुपती काकडे, विभागीय अधिकारी प्रशांत अमृतकर यांनी घटनास्थळी तातडीने भेट दिली. त्यांनी शाहूवाडी पोलिसांना तपासाबाबत सूचना केल्या. पोलिस निरीक्षक अनिल चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार प्रियांका सराटे तपास करत आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, संबंधित बालिकेचे आई-वडील व आजोबा शेतात गेले होते. दुपारी दीडच्या सुमारास संबंधित बालिका नलवडेच्या घरी खेळण्यासाठी गेली होती. त्यावेळी नलवडेने तिच्यावर लैंगिक अत्याचार (molestation) केला. दरम्यान, आई-वडील व आजोबा घरी आले. त्यावेळी बालिकेची अवस्था पाहून पालक हादरले. त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधत फिर्याद दिली.