2020 या वर्षाच्या सुरुवातीपासूनच संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या (coronavirus)साथीच्या विळख्यात अडकलं आहे. हा विषाणू (virus)कसा पसरला, त्यावर उपाय काय आहेत, याबाबत नव-नवीन संशोधनातून बरीचशी माहिती समोर आली आहे. ज्या गोष्टी करणं आपण योग्य समजत होतो त्या, संशोधनाअंती कशा चुकीच्या आहेत हे आढळून (effect of corona)आलं. परंतु बऱ्याच लोाकांमध्ये अजूनही काही गैरसमज आहेत. हे गैरसमज कोणते आहेत ते जाणून घेऊया.

Must Read

कोरोनाग्रस्त क्रिस्टियानो रोनाल्डोने तोडला 'नियम'


प्रयोगशाळेत हा व्हायरस तयार केला गेला: चीनच्या वुहानमध्ये या साथीची सुरूवात झाल्यामुळे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याला वुहान व्हायरस आणि चायना व्हायरस असं म्हटलं. त्यानंतर असं म्हटलं गेलं की हा प्राणघातक विषाणू चीनच्या एका प्रयोगशाळेत तयार केला होता. परंतु स्वत: अमेरिकेच्या (United state)शास्त्रज्ञांनी असे म्हटलं की हा विषाणू मनुष्यनिर्मित नाही किंवा अनुवंशिकरित्या बदल घडवलेला सुद्धा नाही.

कोरोना साध्या तापापेक्षा जास्त धोकादायक नाही: ट्रम्प (donald trump) यांच्यावर असा आरोप आहे की या विषाणूचे गांभीर्य लक्षात येऊन सुद्धा सुरूवातीपासूनच त्यांनी याला सामान्य विषाणू म्हटलं. हा दावा करताना ट्रम्प यांच्यासोबत काही अजून काही मोठे नेतेदेखील होते.

मास्क घालणे आवश्यक नाही: मास्क (mask)घालणं अद्यापही गांभीऱ्याने घेतलं जात नाही. सामान्य लोकांचं सोडा पण कित्येक नेत्यांनी आजपर्यंत अनेकदा मास्क घातले नाहीत. वैज्ञानिकांच्या अभ्यासानुसार ही माहिती समोर आली की, कोरोना काळात मास्क घालणे आवश्यक आहे. जगातील आघाडीची आरोग्य संस्था असलेल्या लान्सेटने 170 अभ्यासांचे विश्लेषण केले आणि त्यात असे सिद्ध झाले की मास्कचा वापर करून कोरोना व्हायरस होण्यापासून बचाव होऊ शकतो.

हायड्रॉसीक्लोरोक्विन HCQ हा प्रभावी उपचार आहे: फ्रान्समधील एका छोट्या अभ्यासाने यावर दावा केला की, हायड्रॉसीक्लोरोक्विन कोरोनावर उपयुक्त औषध आहे. त्यानंतर ट्रम्प यांनी त्याची जोरदार जाहिरात केली. त्यामुळे जगभरातत्याची मागणी वाढली. परंतु हा सिद्धांत चुकीचा ठरला.

चाचण्या वाढल्या म्हणून रूग्ण वाढले: ट्रम्प यांनी असा प्रचार केला की, अमेरिकेत जास्त चाचण्या केल्या म्हणून रूग्ण वाढले. अनेकांनी हा दावा मान्य केला. हा सिद्धांत चुकीचा आहे कारण, बऱ्याच संशोधनामध्ये सत्य परिस्थिती यापेक्षा वेगळी असल्याचं आढळून आलं.

लस सुरक्षित नसणार: लसीच्या संशोधनाबाबत अनेक तर्क-वितर्क काढले जात आहेत. लोक लसीला (corona vaccine)घाबरत आहेत. कोविडशी संबंधित वैज्ञानिकांच्या अहवालानुसार, लस जर योग्य प्रकारे आली तर ती सुरक्षित असेल. कोरोनाबाबत सामान्य लोकांमध्ये असे अनेक गैरसमज आजही आहेत.