Amazon prime- Mirzapur 2

Bollywood gossip- अ‍ॅमेझॉन प्राईमव(Amazon prime) रिलीज झालेल्या ‘मिर्झापूर 2’ या वेबसीरिजसाठी चाहत्यांनी जवळपास दोन वर्षे वाट पाहिली. दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ही सीरिज रिलीज झाली आणि प्रेक्षकांच्या यावर उड्या पडल्या. अर्थात रिलीज होताच या सीरिजने अनेक वादही ओढवून घेतले. अलीकडे खासदार अनुप्रिया पटेल यांनी या सीरिजविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. 

या सीरिजमध्ये मिर्झापूर जिल्ह्याची बदनामी केली जात आहे. सीरिजमधून जातीय तेढ पसरवली जातेय, असा आरोप अनुप्रिया यांनी केला आहे. अनुप्रिया यांच्यानंतर हिंदी कादंबरीकार सुरेंद्र मोहन पाठक यांनीही या वेबसीरिजमधील एका सीनवर आक्षेप घेतला आहे. शिवाय कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

Must Read 

आपल्या ‘धब्बा’ या कादंबरीला ‘मिर्झापूर 2’मध्ये चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आल्याचा आरोप सुरेंद्र मोहन पाठक यांनी केला आहे. सीरिजमधील संबंधित सीन हटवावा अन्यथा कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

काय आहे प्रकरण

‘मिर्झापूर 2’च्या तिस-या एपिसोडमध्ये एक सीन आहे. या सीनमध्ये सत्यानंद त्रिपाठीचे पात्र साकारणारा अभिनेता कुलभूषण खरबंदा ‘धब्बा’ ही कादंबरी वाचताना दाखवण्यात आले आहे. नेमक्या या सीनवर लेखक सुरेंद्र मोहन पाठक यांनी आक्षेप घेतला आहे.

‘ सीरिजमधील पात्र वाचत असलेल्या कादंबरीचा माझ्या कादंबरीशी काहीही संबंध नाही. सीरिजमधील पात्र पुस्तक वाचता दाखवताना व्हाईसओव्हर ऐकू येतो, तो अतिशय अश्लील आहे. त्याचा माझ्या ‘धब्बा’ कादंबरीशी काहीही संबंध नाही. लेखक या नात्याने मी असे काही लिहिण्याचा विचारही करू शकत नाही. सीन पाहून मात्र तो ‘धब्बा’मध्ये लिहिलेल्या ओळी वाचतोय, असे जाणवते. हा माझी व माझ्या  कादंबरीची प्रतीमा मलिना करण्याचा प्रयत्न आहे. हा सीन त्वरित सीरिजमधून हटवावा, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल,’ असे सुरेंद्र मोहन पाठक यांनी म्हटले आहे.

तिसरा सीझन लवकरच

नुकताच मिझार्पूर' वेबसीरीजचा दुसरा सीझन रिलीज (Amazon prime) करण्यात आला. सोशल मीडियावर सगळीकडे याचीच चर्चा सुरू आहे. प्रेक्षकांचा या सीरीजला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. आता या सुपरहिट वेबसीरीजचा तिसरा सीझनही आणण्याची तयारी केली जात आहे. आधीच ही सीरीज भारतात सर्वात जास्त बघितली गेलेली सीरीज ठरली आहे. 

अशात आता या सीरीजचे फॅन्स या वेबसीरीजच्या तिस-या सीझनचीही आतुरतेने वाट बघतील. बॉलिवूड हंगामाच्या एका रिपोर्टनुसार, अ‍ॅमेझॉन प्राइमच्या काही सूत्रांनी सांगितले की, ‘मिझार्पूर’ च्या तिस-या सीझनची तयारी सुरू आहे. पहिल्या सीझनच्या तुलनेत मिझार्पूरच्या दुस-या सीझनचाबजेट दुप्पटीपेक्षा जास्त होते. तसेच कलाकारांनाही दुप्पट मानधन देण्यात आले होते.