marathi-actress-gets-emotional-for-her-hubby

यंदाच्या वर्षी अनेक कलाकारांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला. त्यापैकी एक म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता आशुतोष भाकरे (Actor Ashutosh Bhakre). काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री मयुरी देशमुखचा पती आशुतोषने आत्महत्या करत त्याचा जीवन प्रवास संपवला. आशुतोषने नांदेडमध्ये त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आयुष्य संपवलं. त्यानंतर मयुरी त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक पोस्ट शेअर केली. त्यानंतर तिने आता एक व्हिडिओ शेअर केला. त्यामध्ये देखील मयुरी तिच्या पती बद्दल बोलताना दिसत आहे. 

Advertise

Must Read

1) कोल्हापुरात मुसळधार; पंचगंगेच्या पातळीत वाढ

2) SBI चा इशारा ! सणासुदीच्या दरम्यान गायब होऊ शकतात तुमच्या अकाऊंटमधील पैसे

3) सतत ‘सेल्फी’ घेता ? ‘हा’ गंभीर आजार तर नाही ना ? या 4 गोष्टी लक्षात ठेवा

4) ही आहेत 5 बेस्ट झिरो बॅलन्स बचत खाती

मयुरीने तिच्या खास मैत्रीणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत, तिच्या कठिण प्रसंगी धावून आल्याचा उल्लेख केला आहे. आशुतोषला अनेक दिवसांपासून नैराश्य आलं होतं. त्यामुळे मानसोपचार तज्ज्ञांचे उपचारही त्याच्यावर सुरू होते.  त्यांच्या या प्रवासात मयुरीच्या मैत्रीणीने केलेले प्रयत्न इत्यादी गोष्टी आठवत मयुरी या व्हिडिओद्वारे व्यक्त झाली आहे. 

दरम्यान, आशुतोषला मोठ्या बॅनरची कामे मिळत नसल्याने त्याला नैराश्य आले होते. आशुतोष साडे चार वर्षांपासून मुंबईत राहत होता. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर मागील महिन्यात तो नांदेडला आपल्या आई-वडिलांकडे गेला.