Entertainment News- अरबाज खान आणि मलायका अरोरा (malaika arora)यांचे १८ वर्षांचे रिलेशनशीप अचानक तुटल्याचे समजताच त्यांच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला होता. नेमके कोणत्या कारणामुळे त्यांचा घटस्फोट झाला हे त्यांच्या चाहत्यांना जाणून घ्यायचे होते. त्यांचे विभक्त झाल्याची बरीच कारणे समोर आली पण आतापर्यंत खरे कारण समोर येऊ शकले नाही. कोण म्हणतं की त्यांचे नाते संपुष्ठात येण्याचे कारण अरबाज खानची (arbaz khan)सट्टा लावण्याचे व्यसन ज्यामुळे मलायका त्रस्त झाली होती. तर कुणी त्यांचे नाते तुटण्यामागे सलमान खान असल्याचे सांगतात.


Must Read

1) कोल्हापुरी! ऑनलाईन दुकानात आता घरबसल्या मिळणार अस्सल कोल्हापुरी चप्पल

2) महाविकासआघाडी सरकार हे बिघाडी सरकार आहे : हर्षवर्धन पाटील

3) प्रेग्नन्सीची न्यूज दिल्यानंतर अनिता हसनंदानी शेअर केले असे PHOTO

4) शुल्लक कारणावरुन रिक्षाचालकाला मारहाण; VIDEO

5) डोक्यात लोखंडी रॉडने वार करत पत्नीला संपवलं


अरबाज खानने एका मुलाखतीत त्याच्या आणि मलायकाच्या नात्याबद्दल सांगितले. तो म्हणाला की, एका मुलाच्या आई वडिलांसाठी हे कठीण पाऊल होते पण गरजेचे होते. आम्ही त्या मार्गावर उभे होते जिथे आणखीन गोष्टी बिघडवण्याऐवजी चांगले ठेवण्यासाठी हाच एकमात्र मार्ग उरला होता.

अरबाज-मलायकाचे नाते संपण्याचे कारण अरबाज खानचे फ्लॉप करिअर होते पण त्याहून मोठे कारण होते सलमान खान. अरबाज आणि मलायकाचे (malaika arora) नाते सलमान खानमुळे संपले.

मलायकाला तिचा नवरा कित्येक वर्षे सलमानच्या (salman khan)छत्रछायेखाली राहत होता, हे खटकत होते. तसेच हादेखील खुलासा झाला की मलायकाला नेहमी हे वाटत होते की खान कुटुंबासाठी तो अनोळखी आहे. याशिवाय तिचा दीर सलमान खानचे टोकणे मलायकाला अजिबात आवडत नव्हते. मलायका याबद्दल आधीही बोलली आहे की सलमानला मलायकाचे कपडे परिधान करण्याची पद्धत आणि तिच्या फ्रेंड्सबद्दल नेहमी तक्रार असायची.

अरबाज खान आयपीएलमध्ये सट्टा लावत होता जे मलायका आणि सलीम खान यांनाही आवडत नव्हते. अरबाज खानला सट्टेबाजी प्रकरणात ठाणे क्राइम ब्रांचने स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी बोलवले होते. जिथे त्याने स्वीकार केले की तो सहा वर्षांपासून आयपीएल सामन्यांमध्ये सट्टा लावत होता आणि मागील वर्षी २.७५ कोटी रुपये हरला होता.