Main Featured

'मराठा आरक्षणासाठी संविधान दुरुस्ती करुन वटहुकूम काढावा'

maratha reservation
Maharashtraमराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने संविधान (Constitution)दुरुस्ती करुन वटहुकून काढावा, अशी मागणी ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी केली. मराठा आरक्षणामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का बसेल, हा समज चुकीचा आहे. माझा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे, असे हरिभाऊ राठोड यांनी सांगितले. 

Must Read

1) आमदारानं 19 वर्षांच्या मुलीशी केलं लग्न

2) मराठमोळी नेहा पेंडसे एथनिक ड्रेसमध्ये दिसते झक्कास..! Photos

3) राजस्थान रॉयल्सच्या कर्णधाराला 12 लाखांचा दंड

4) शिक्षक भरती घोटाळ्यात भाजपा नेत्याला अटक

5) Video: १०३ वर्षीय आजोबांनी १४ हजार फुटांवरुन मारली उडली


ते बुधवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारने हस्तक्षेप करण्याची मागणी केली. मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने वटहुकूम काढावा. वटहुकूम काढल्यानंतर संसदेत घटनादुरूस्ती  (Constitution)करावी लागेल. यासाठी मी छत्रपती संभाजीराजे यांना घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narednra modi)यांची भेट घेणार असल्याचेही हरिभाऊ राठोड यांनी सांगितले.


गेल्या काही दिवसांत राज्यात मराठा आरक्षणासंदर्भातील घडामोडींना वेग आला आहे. माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी आज नवी मुंबईच्या माथाडी भवनमध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढील रणनीती ठरवण्यासाठी बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला हरिभाऊ राठोड आणि मुस्लिम ओबीसी संघाचे अध्यक्ष युसूफ मणियार हेदेखील उपस्थित होते. छत्रपती संभाजीराजे या बैठकीला उपस्थित आहेत. त्यामुळे आता या बैठकीअंती मराठा समाजाचे नेते काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


छत्रपती संभाजीराजेंची राज्य सरकारवर टीका


मराठा आरक्षणासंदर्भातील पुढील रणनीती ठरवण्यासाठी आज नवी मुंबईत मराठा नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी छत्रपती संभाजीराजे यांनी महाविकासआघाडी सरकारच्या भूमिकेवर टीका केली. राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत चालढकल करत आहे. मराठा समाजाला सरकारने फसवलं. राज्य सरकार त्यांच्या हातात असलेल्या गोष्टीही करत नाही. सारथी संस्था सुद्धा तुम्ही बुडीत घातली, अण्णासाहेब पाटील महामंडळाला काय दिलं?, फक्त राज्य सरकारने खेळखंडोबा केला, अशी टीका संभाजीराजे यांनी केली.