lemon-is-beneficial-for-liver-know-how-to-use

Health
सहसा थकवा किंवा अशक्तपणा जाणवत असेल तर आपण लिंबूपाणी (lemon juice) पितो. मात्र तुम्हाला माहिती आहे का नियमित लिंबू पाणी प्यायल्याने आपल्या शरीरातील महत्त्वाचा अवयवही हेल्दी राहतो आणि हा अवयव म्हणजे लिव्हर किंवा यकृत (liver). अन्न पचन आणि शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे.  यकृत आहारामार्फत मिळालेली खनिजं, जीवनसत्त्वं, अँटीऑक्सिडंट्स हे सर्व पोषक घटक वेगळं करतं आणि शरीराच्या आवश्यकतेनुसार त्या अवयवांमध्ये पोहोचवते. यकृत शरीराची अनेक महत्त्वपूर्ण कार्ये पूर्ण करण्यात मदत करतं, म्हणून ते निरोगी राहणं खूप महत्त्वाचं आहे.

myupchar.com शी संबंधित एम्सचे डॉ. व्ही. के. राजलक्ष्मी म्हणाल्या, लठ्ठपणा, मधुमेह, मद्यपान, विशिष्ट रसायनं किंवा विषारी पदार्थ, असुरक्षित लैंगिक संबंध यकृत रोगाचा धोका वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतात. लिंबू यकृत स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतं. लिंबूमध्ये बरेच पोषक घटक असतात. फक्त जेवणातच नव्हे तर आयुर्वेद आणि पारंपारिक औषधांमध्येही लिंबूचा अनेक प्रकारे वापरल केला जातो. साइट्रस जातीतील लिंबू हे 'जीवनसत्त्व सी'चा उत्तम स्रोत आहे, ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते.

Advertise

myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला यांनी सांगितलं लिंबामधले डी-लिमोनेन घटक यकृत स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. जीवनसत्त्व सी युक्त असल्याने लिंबू यकृतास पचन प्रक्रियेस मदत करण्यासाठी एन्जाइम तयार करतं.

यकृतासाठी नियमित लिंबूपाणी प्या. लिंबूपाण्यात साखरेऐवजी मध मिसळा. साखर वापरल्याने समस्या उद्भवू शकते. आयुर्वेदानुसार लिंबू पिण्यासाठी सकाळची वेळ चांगली आहे. सकाळी कोमट लिंबू पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी द्रव्यं बाहेर जातात आणि पचन निरोगी होतं. लिंबाचा रस हा पोटातील पाचक रसांप्रमाणेच असतो. हे अन्नपचनासाठी आवश्यक असलेलं पित्त तयार करण्यासाठी मदत करतं.

लिंबाचा रस केवळ यकृत निरोगी ठेवण्यासच नव्हे तर त्वचा आणि नखं निरोगी ठेवण्यासाठी, पोट निरोगी ठेवण्यासाठी, वजन कमी करण्यास देखील मदत करतं. लिंबू शरीरात आंबटपणा निर्माण करण्यापासून रोखतं. म्हणून पीएच पातळी सामान्य राहण्यासाठी या पेयाचं सेवन करणं चांगलं मानलं जातं.

लिंबाचा रसाच्या व्यतिरिक्त बीट, हिरवं सफरचंद आणि गाजर रस देखील यकृतासाठी उत्तम आहे. तसंच हळद, लसूण, अक्रोड, ब्रोकोली, अ‍ॅवोकॅडो खाल्ल्यानंही यकृती निरोगी राहतं. याशिवाय पुरेशी झोपही गरजेची आहे. दिवसातून किमान 6 तास झोपणं आवश्यक आहे. उशिरा झोपणं आणि उशिरा उठणं टाळा. तसंच सिगारेट आणि मद्यपान यापासून दूर राहा.