Main Featured

कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभरात आढळले ''इतके" रूग्ण

Kolhapur  corona casesKolhapur जिल्ह्यात दिवसभरात 180 व्यक्ती कोरोना (corona)मुक्त झाल्या. तर 86 नवे बाधित आढळले आहेत. तर 4 बाधित व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. स्वॅब (swab test) संकलनाची संख्याही कमी होऊन दिवसभरात 400 व्यक्तीचे स्वॅब घेतले आहेत. नवे बाधित सापडण्याचे प्रमाण कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. 

जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 45 हजार 139 झाली आहे तर कोरोनामुक्तांची संख्या 34 हजार 950 झाली आहे. तर आजवरच्या एकूण मृतांची संख्या एक हजार 470 झाली आहे. 

Must Read

कोवीड सेंटरवर कोरोनाची तपासणीसाठी पूर्वी होत असलेली गर्दीही कमी झाली आहे. ज्या रूग्णांची लक्षणे कोरोनाच्या व्याख्येत बसतात. फक्त त्यांचेच स्वॅब घेण्यात (swab test) येत आहेत. मात्र अशी लक्षणे असणाऱ्यांचे प्रमाणही कमी होत असल्याने स्वॅब संकलनही कमी झाले आहे. दिवसभरात एकूण 7 नवे गंभीर बाधित सापडले आहेत. त्यांच्यावर सीपीआर व खासगी रूग्णालयात उपचारासाठी आणले आहे. 


एकूण कोरोनाग्रस्त :   45 हजार 139 

एकूण कोरोनामुक्त  : 34 हजार 950 

मृत्यू                      :1 हजार 470